घरताज्या घडामोडीदेशात ५० पेक्षा कमी वयोमानाच्या नागरिकांना लस कधी ? केंद्राने दिले उत्तर

देशात ५० पेक्षा कमी वयोमानाच्या नागरिकांना लस कधी ? केंद्राने दिले उत्तर

Subscribe

महाराष्ट्राला ७.५ लाख कोरोना लशींचा तुटवडा

महाराष्ट्रात कोरोनाच्या लसीकरणाच्या मोहिमेला सुरूवात झाली आहे. पण सुरूवातीच्या टप्प्यातच कोविन एपमध्ये तांत्रिक बिघाडाचे कारण आज पहिल्याच दिवशी समोर आले. एपमधील तांत्रिक अडचणींमुळे मॅन्युअली काही गोष्टी कराव्या लागत असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. राज्यातील कोरोना विरोधातील लसीकरणातील मोहिमेत एकुण १७ लाख लसींची महाराष्ट्राला गरज आहे. त्यापैकी राज्याला फक्त १० लाख डोस मिळाले आहेत. पण आणखी ७.५ लाख डोस मिळाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महाराष्ट्राला उर्वरीत डोस तातडीने मिळावेत अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली. डॉ हर्ष वर्धन यांनी देशातील विविध राज्यांचे आरोग्य मंत्री आणि सचिव यांच्यासोबत संवाद साधला. त्यावेळी डॉ. राजेश टोपे बोलत होते. देशात ५० पेक्षा कमी वयोमान असणाऱ्यांना कधी लस मिळणार याबाबतची विचारणा राजेश टोपे यांनी केंद्राकडे केली.

महाराष्ट्रात एकुण 285 सेंटरवर आज लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली. कोविन एपमध्ये तांत्रिक प्रॉब्लेम असल्याने काही ठिकाणी मॅन्युअल पद्धतीने कामे करण्यात आली. काही ठिकाणी रविवारी सकाळी हे एपशी संबंधित काम पुर्ण होणार आहे. कोविड एपवर सेशन जनरेट झाले नाहीत. त्यामुळेच कोविन एपच्या वापराला पर्याय म्हणून मॅन्युअल पद्धतीने काम करण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले. काही ठिकाणी एप धीम्या गतीने सुरू असल्याच्याही तक्रारी आल्या. पहिल्या टप्प्यात एकुण ८ लाख लोकांना लस देण्यात येणार आहे. दोन टप्प्यातील लसीकरणामुळे एकुण १६ लाख लशींची गरज महाराष्ट्राला आहे. त्यामुळे उर्वरीत ७.५ लाख डोस लवकर मिळावेत अशी मागणी डॉ टोपे यांनी हर्षवर्धन यांना केली. यावर उत्तर देताना केंद्रीय आरोग्य सचिवांनी स्पष्ट केले की चिंता करण्याची कोणतीही गोष्ट नाही. दोन टप्प्यातील लशी या पुरेशा प्रमाणात मिळतील. त्यामुळे राज्यासाठी मंजुर झालेल्या लशींच्या पेक्षा जास्त लसी देण्यात येतील असे केंद्रामार्फत सांगण्यात आले. राज्यांच्या डोसची चिंता करण्याची गरज नाही. राज्याला अतिरिक्त लशींचा पुरवठा हवा असल्यास राज्यांनी आपले प्रस्ताव पाठवावेत असे केंद्राकडून सांगण्यात आले. सध्या कोरोना लस पुरवण्यासाठीचे वेळापत्रक आहे, त्यानुसारच राज्यांना डोसेस मिळणार आहेत.

- Advertisement -

५० पेक्षा कमी वय असणाऱ्यांना लस कधी?

केंद्राकडून कोरोना योद्धा, फ्रंटलाईन वर्कर आणि ५० वयोमानापेक्षा अधिक वय असणाऱ्यांसाठी कोरोनाची लस कधी देणार याबाबतची घोषणा केली आहे. पण ५० पेक्षा कमी वय असणाऱ्या वयोगटासाठी कधी लस देणार याबाबतची घोषणा अद्यापही झालेली नाही. देशाभरात जवळपास २६ कोटी इतकी लोकसंख्या ही ५० वयापेक्षाही कमी वय असलेली आहे. एक मोठी लोकसंख्या ही कोरोनाची लस कधी मिळणार वाट पाहत आहे. त्यामुळेच या वयोगटाला कधी लस मिळणार असा प्रश्न अनेकांकडून येत आहे. त्यामुळेच कधी लस मिळणार याबाबतची घोषणा करावी असे आवाहन डॉ टोपे यांनी केले. यावर उत्तर देताना लवकरच याबाबतची घोषणा करून सर्वांना पुढील कार्यक्रम सांगण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -