घरCORONA UPDATEअहमदनगरमध्ये परदेशी नागरिकांना लपवून ठेवलं; मशिदीच्या विश्वस्तांवर गुन्हा दाखल

अहमदनगरमध्ये परदेशी नागरिकांना लपवून ठेवलं; मशिदीच्या विश्वस्तांवर गुन्हा दाखल

Subscribe

जामखेड आणि मुकंदनगर परिसरातील दोन मशिदींमधून अहमदनगर पोलिसांनी रविवारी सुमारे १९ परदेशी नागरिकांना ताब्यात घेत जिल्हा रुग्णालयातील क्वारंटाईन वॉर्डमध्ये दाखल केले.

दिल्लीच्या निजामुद्दीन येथे तबलीघी जमात कार्यक्रमात सहभागी झालेल्या १० परदेशी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा भागात राहत होते. महाराष्ट्र पोलिसांनी मंगळवारी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा भागातील मशिदीच्या दोन विश्वस्तांनाविरोधात याबाबतची माहिती न दिल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. आफ्रिकन खंडातील १० परदेशी नागरिक मशिदीच्या आवारात होते. “आम्हाला माहिती मिळाली होती की काही विदेशी नागरिक मशिदीच्या आत आहेत आणि म्हणूनच आम्ही शोध घेतला आणि मशिदीच्या आवारात १० जण आढळले. ते दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलीघी जमात कार्यक्रमात गेलेल्या त्याच गटाचा एक भाग होते आणि त्यानंतर तामिळनाडूला गेले. नंतर काही धार्मिक हेतूने अहमदनगरला आले,” असे अहमदनगरचे एसपी सागर पाटील म्हणाले. ते पुढे म्हणाले, “परदेशातून परत आलेले आणि परदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या व्यक्तींची माहिती अधिकाऱ्यांना द्यावी, असं आवाहन राज्य सरकार वारंवार करूनही, मशिदी विश्वस्तांनी माहिती दिली नाही. सध्याच्या साथीच्या रोगाच्या परिस्थितीत त्या व्यक्तींना लपविण्याचा प्रयत्न केला.”


हेही वाचा – कोरोनावरील लस तयार करायला एक वर्ष लागेल – युरोपियन औषध एजन्सी

- Advertisement -

जामखेड आणि मुकंदनगर परिसरातील दोन मशिदींमधून अहमदनगर पोलिसांनी रविवारी सुमारे १९ परदेशी नागरिकांना ताब्यात घेत जिल्हा रुग्णालयातील क्वारंटाईन वॉर्डमध्ये दाखल केले. यापैकी दोघे आयव्हरी कोस्ट आणि फ्रान्समधील होते. ते कोरोना पॉझिटीव्ह आले. यामुळे दिल्लीतील कार्यक्रमावरुन परत आलेल्या इतर व्यक्तींबद्दल पोलिसांकडून अधिक तपासणी केली जात आहे. तेलंगणा आणि जम्मू-काश्मीरमधील सुमारे १० जण निझामुद्दीन येथे झालेल्या कार्यक्रमास उपस्थित होते, त्यांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. ३००हून अधिक जणांना अलग ठेवण्यात आले आहे, तर अधिकाऱ्यांकडून इतर लोकांचा शोध सुरु आहे.

अहमदनगर पोलिसांनी एकूण तीन गुन्हे २९ परदेशी नागरिकांना आश्रय देणाऱ्या आणि अधिकाऱ्यांपासून माहिती लपवून ठेवलेल्या तीन मशिदींच्या विश्वस्तांविरूद्ध दाखल केले आहेत. विश्वस्तांवर आयपीसी आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, देशभरातील अधिकारी आता या महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीत तबलीघी जमातच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. जेणेकरून कोरोनाचा प्रसार थांबू शकेल. या कार्यक्रमाला १ हजार ५००हून अधिक जणांनी हजेरी लावली आणि त्यानंतर त्यांनी देशातील विविध राज्यांमध्ये प्रवास केला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -