आता भाजपच म्हणतंय…’मैं भी चौकीदार’!

भारताच्या प्रगतीसाठी मेहनत करणारा प्रत्येकजण चौकीदार आहे', असं मोदींनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Mumbai
Main Bhi chaukidar, BJP's new campaign
भाजपचा नवा फंडा - 'मैं भी चौकीदार'

काँग्रेसने अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘देश चौकीदार चोर है’ असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींना जोरदार टोला हाणला होता. गेल्या काही महिन्यांमध्ये ‘चौकीदार चोर हैं’ या तीन शब्दांचा काँग्रेसने भाजप आणि मोदींविरुद्ध पुरेपूर वापर करुन घेतला. मात्र, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता भाजपनेच ‘मैं भी चौकीदार’ असं म्हणत काँग्रेसला चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपने ‘मैं भी चौकीदार’ अशी नवीन मोहीमच सुरु केली आहे. शनिवारी (आज) पंतप्रधान मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन या मोहिमेला सुरुवात करुन दिली आहे. ‘आज प्रत्येक भारतीय म्हणतोय – मी पण चौकीदार’ असं ट्विट मोदींनी केलं आहे. ‘तुमचा चौकीदार इथे उभा राहून देशसेवा करतो आहे. मात्र, मी एकटा नाहीये. चार, अस्वच्छता, सामाजिक तेढ याविरोधात लढणारा देशातला प्रत्येकच जण या देशाचा चौकीदार आहे. भारताच्या प्रगतीसाठी मेहनत करणारा प्रत्येकजण चौकीदार आहे’, असं मोदींनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

विशेष म्हणजे भाजपने त्यांच्या या नव्या कॅम्पेनसाठीॉ’हा, मैं भी चौकीदार हूँ’ असं एक गाणंदेखील तयार केलं आहे. २०१४ ची निवडणुक असो किंवा यंदाची भारतीय जनता पार्टीने आपल्या प्रचारासाठी नेहमी काही नाही काही हटके मोहिमा राबवल्या आहेत.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here