Live दिल्लीतील अर्पिता पॅलेसमध्ये भीषण आग; १७ जणांचा मृत्यू

नवी दिल्लीमधील करोलबाग परिसरातील अर्पिता पॅलेस हॉटेलला आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली. या आगीच्या घटनेमध्ये १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Delhi
Major Fire Breaks Out At Delhi Hotel, 2 Dead
दिल्लीतील अर्पिता पॅलेसमध्ये आग

पहाटे ४ च्या दरम्यान लागलेल्या आगीत १०.३० वाजेपर्यंत १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.


हॉटेलमधील आगीतील मृतांची संख्या १४ वर


या आगीच्या घटनेमध्ये सात पुरुषांचा तर एका महिलेचा आणि एका लहान समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.


आगीच्या घटनेमध्ये अजून सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून मृत्यांचा आकडा नऊवर गेला आहे.


नवी दिल्लीमधील करोलबाग परिसरातील अर्पिता पॅलेस हॉटेलला आज सकाळी ४ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग हॉटेलच्या पहिल्या मजल्याला लागल्याची घटना घडली असून अनेकांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीतून उड्या मारल्याचे समोर आले आहे. या घटनेमध्ये दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर अनेक जण जखमी झाले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी अग्निशमन दलाच्या २० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच हॉटेलमधील २५ जणांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे तर अजूनही काही जण या हॉटेलमध्ये अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अग्निशमन दलालाकडून मोठ्या प्रमाणात मदत आणि बचावकार्य सुरु आहे.