घरदेश-विदेशचिटफंडचे भूत उतरवण्यासाठीच ममतांनी घेतली मोदी, शहांची भेट?

चिटफंडचे भूत उतरवण्यासाठीच ममतांनी घेतली मोदी, शहांची भेट?

Subscribe

चिटफंड घोटाळ्यातून सुटका व्हावी म्हणून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सध्या दिल्लीत आहेत. बुधवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्या दोघांचे हसरे फोटो मीडियात व्हायरल झाल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या. लोकसभा निवडणुकीदरम्यान, ममता बॅनर्जी यांनी भाजपशी, विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याशी व्यक्तिगत वैर घेतलं होतं. मग ममता बॅनर्जी यांना अचानक काय झाले की ते आता पंतप्रधान मोदी यांच्याशी जुळवून घेत आहेत? त्यावर कडी म्हणजे ममता बॅनर्जी या गुरुवारी थेट अमित शहा यांनाही भेटल्या. त्याचे कारण त्यांनी एनआरसी यादी सांगितले असले तरी प्रत्यक्षात काहीतरी दिल्लीत शिजतेय आणि त्याचा सुगावा लागल्यामुळे ममता बॅनर्जी थेट दिल्लीत पोहचल्या, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.


हेही वाचा – मोदींनी टीका केलेला बडबोलपणा करणारा नेता कोण?

सुदिप्ता सेन यांच्यावरील कारावाईचा परिणाम?

ममता बॅनर्जी या शारदा चिटफंड प्रकरणात अडकल्या आहेत. त्यांचा विश्वासू सहकारी सुदिप्ता सेन हे या चिटफंड प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. सीबीआयने त्यांना अटक केल्यास ममता बॅनर्जी यांनाही जेलमध्ये जावे लागणार आहे. तर दुसर्‍या बाजूला ईडीनेही सुदिप्ता सेन यांच्याविरुद्ध पाश आवळत आणले आहेत. त्यामुळे सेन यांचा जीव गुदमरायला लागला आहे. परिणामी सेन यांच्यात जीव असलेल्या ममता बॅनर्जी याही सध्या अस्वस्थ झाल्या आहेत. सीबीआय आणि ईडीची कारवाई रोखायची असेल अथवा प्रलंबित करायची असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री असलेल्या अमित शहा यांची मनधरणी करायला हवी. त्या हेतूनेच ममता बॅनर्जी सध्या दिल्लीच्या वारीवर असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. स्वत: ममता बॅनर्जी यांनी या भेटीचे कारण एनआरसी यादी सांगितले असले तरी त्यांच्या पाठिशी बसलेले चिटफंडचे भूत उतरवण्यासाठीच त्यांनी मोदी, शहांची भेट घेतल्याची चर्चा सध्या देशभर सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -