घरदेश-विदेशजामीन मिळाल्यानंतर प्रियंका शर्माचा माफी मागण्यास नकार

जामीन मिळाल्यानंतर प्रियंका शर्माचा माफी मागण्यास नकार

Subscribe

प्रियंकाने माफी मागावी या अटीवर तिला कोर्टाने जामीन दिला होता. मात्र, जामीन मिळाल्यानंतर प्रियंका शर्माने माफी मागण्यास नकार दिला.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याचे आक्षेपार्ह मिम्स सोशल मीडियावर शेअर करणार्या भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारी प्रियंका शर्माने जेलमधून सुटल्यानंतर ममता बॅनर्जी यांची माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला आहे. जामीन मिळाल्यानंतर प्रियंका शर्माने पत्रकार परिषद घेतली यामध्ये हे सांगितले. प्रियंकाने माफी मागावी या अटीवर तिला कोर्टाने जामीन दिला होता. मात्र, जामीन मिळाल्यानंतर प्रियंका शर्माने माफी मागण्यास नकार दिला. प्रियंकाला जामीन मिळाल्यानंतरही १८ तास तिची सुटका करण्यात आली नव्हती. आपली सुटका करताना आपल्याकडून माफीनामा लिहून घेण्यात आला असे प्रियंकाने सांगितले. माझ्याकडून जरी माफीनामा लिहून घेतला असला तरी मी माफी मागणार नाही, हा खटला मी लढत राहीन असं प्रियंकाने सांगितले.

- Advertisement -

मला घाबरवण्याचा प्रयत्न केला गेला मात्र मी घाबरणार नाही. आता घाबरण्याची काहीच गरज नाही. तसंच प्रियंकाने सांगितले की, मला कोणाशी बोलून दिले नाही. कुटुंबिय, पक्ष, वकिलांशी देखील बोलून दिले नाही. मी माफी मागणार नाही. मी त्यांच्याविरोधात लढणार आहे. तसंच मला कालच जामीन मिळाला होता. मात्र माझी १८ तास सुटका केली नाही, असे प्रियंकाने सांगितले. दरम्यान, दुसरीकडे प्रियंका शर्माला सोमवारी जामीन न दिल्यामुळे सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली. सुप्रीम कोर्टाने सांगितले की, पहिल्या नजरेमध्ये प्रियंकाची अटक मनमानी आहे. जर तिची सुटका केली नाही तर अवमानाचे प्रकरण सुरु करणार. तसंच कोर्टाने सांगितेलकी, अर्ध्या तासामध्ये तिची सुटका करा.

भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारी प्रियंकाला मागच्या शुक्रवारी कोलकात्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. २५ वर्षीय प्रियंकाच्या कुटुंबियांनी दाखल केलेली एफआयआर रद्द आणि जामीनावर सुटका करण्याची मागणी सुप्रीम कोर्टात करण्यात आली. प्रियंका शर्माने प्रियंका चोप्राच्या फोटोवर ममता बॅनर्जी यांचा चेहरा सुपर इम्पोज करुन फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून प्रियंका यांना जोरदार विरोध झाला होता. याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी प्रियंकाला अटकही केली होती. तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -