घरदेश-विदेशममतादीदी हे काय म्हणालात!

ममतादीदी हे काय म्हणालात!

Subscribe

पुलवामा हल्ल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

पुलवामातील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे दुःख देशातील नागरिकांनी अद्याप पचवताही आली नसताना राजकीय वर्तुळातील यासंबंधीच्या बेताल वक्तव्याला सुरुवात झाली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला हा निवडणुकीपूर्वी कसा झाला?, असे म्हणत त्यांनी हल्ल्याच थेट संबंध निवडणुकांशीच जोडला आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना ममता बॅनर्जी यांनी आपला फोन टॅप होत असल्याचा देखील आरोप केला.

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी

पुलवामासंदर्भात गुप्तचर यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिला होता. त्यानंतर देखील त्याकडे दुर्लक्ष का केलं गेलं? सीआरपीएफच्या जवानांना मोठ्या संख्येनं का रस्त्याच्या मार्गानं पाठवलं जात होतं? जवानांना विमानाने का नाही पाठवलं गेलं? असे एक ना अनेक सवाल करत ममता बॅनर्जी यांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे. या हल्ल्यासाठी जबाबदार लोकांना पकडून त्यांच्याविरोधात कडक कारवाई करावी. तसेच याकाळात भाजप – आरएसएसनं दंगली घडवण्याचा प्रयत्न केला तर देश त्यांना माफ करणार नाही, अशा शब्दात ममतांनी भाजपला लक्ष्य केलं आहे.

- Advertisement -

महाआघाडीत सामील 

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुलवामा हल्ल्यानंतर विरोधक सरकारच्या पाठीमागे भक्कमपणे उभे असल्याचं सांगितलं होतं. या दहशतवादी हल्ल्याचं कोणतंही राजकारण होता नये, असं देखील राहुल यांनी म्हटलं होतं. पण, ममता बॅनर्जी यांनी मात्र सरकारला धारेवर धरत सरकारला थेट प्रश्न विचारले आहे. मुख्यबाब म्हणजे भाजविरोधात सर्व विरोधकांनी महाआघाडीची स्थापना केली आहे. ममता बॅनर्जी देखील या महाआघाडीमध्ये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -