घरट्रेंडिंग'मोदींनी हिंमत असल्यास पश्चिम बंगालमधून निवडणूक लढवावी'

‘मोदींनी हिंमत असल्यास पश्चिम बंगालमधून निवडणूक लढवावी’

Subscribe

मी स्वत: वाराणसी मतदारसंघातून लढू शकते. मात्र, मोदी जक बंगालमधून लढले तर त्यांची अवस्था नोटाबंदीसारखी होईल', असा टोला ममता बॅनर्जी यांनी लगावला

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक पश्चिम बंगालमधून लढवावी’, असे आव्हान पश्चिम बंगालच्या मुख्ममंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदींना दिले आहे. दरम्यान, ‘जरी मोदींनी हा निर्णय घेतला तरी तो त्यांच्या नोटबंदीच्या प्रयोगाप्रमाणे अयशस्वी ठरेल’, असा टोलाही ममता यांनी यावेळी लगावला. पश्चिम बंगालमध्ये पत्रकारांशी बोलत असताना मोदींसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर देतेवळी त्या अशाप्रकारे बरसल्या. यावेळी ममता म्हणाल्या की, ‘ लोकशाहीने कोणालाही कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला आहे. मी स्वत:देखील वाराणसी मतदारसंघातून लढू शकते. मात्र, ते बंगालमधून लढले तर त्यांची अवस्था नोटाबंदीसारखी होईल आणि त्यांना जनतेच्या न्यायालयात दंडित केलं जाईल.’


वाचा: इम्रान खानने अझहरला भारताकडे सोपवावं – सुषमा स्वराज

पत्रकारांशी संवाद साधतेवेळी त्या म्हणाल्या की, ‘मला माहीत आहे की मोदींनी देशाचे नुकसान केले आहे. त्यामुळे इथे त्यांना लोकांना उत्तर द्यावे लागेल. त्यांनी पश्चिम बंगालमधून निवडणूक लढवली तर आम्हाला खूप आनंद होईल. समजा त्यांना इथून निवडणूक लढवतेवेळी एका मतदारसंघाची भीती वाटत असेल, तर त्यांनी सर्वच ४२ जागांवरुन निवडणूक लढवावी’. ‘बंगालचे मतदान केंद्र अत्यंत संवेदनशील आहे. त्यांनी येथून निवडणूक लढवावी. येताना त्यांनी सोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल या आपल्या राजकीय सेनांनाही येथे आणावे. त्यांनी इथल्या संस्कृतीचा आणि भोजनाचा आस्वाद घ्यावा. जनता त्यांना निरोप देईल’, असा खोचक टोमणाही त्यांनी यावेळी मारला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -