घरदेश-विदेशममता बॅनर्जींंकडून लोकशाहीची गळचेपी - अमित शहा

ममता बॅनर्जींंकडून लोकशाहीची गळचेपी – अमित शहा

Subscribe

ममता बॅनर्जी लोकशाहीची गळचेपी करत आहेत. पण, भाजप पश्चिम बंगालमध्ये बदल घडवणार असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.

भाजपच्या पश्चिम बंगालमधील रथ यात्रेला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी परवानगी नाकारली. त्यानंतर पश्चिम बंगाल उच्च न्यायालयानं देखील रथ यात्रेला कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत परवानगी नाकारली. त्यावरून आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ममता बॅनर्जींंवर टीका केली आहे. भाजपच्या नियोजित रथ यात्रेमुळे ममता बॅनर्जींची झोप उडाली. शिवाय, ममता बॅनर्जी लोकशाहीची गळचेपी करत असल्याचं देखील यावेळी अमित शहा यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगाल सरकारनं आजपासून सुरू होणाऱ्या भाजपच्या रथ यात्रेला परवानगी नाकारली. त्यानंतर भाजपनं उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. पण त्याठिकाणी देखील भाजपच्या पदरी निराशाच पडली. त्यामुळे नियोजित रथ यात्रा भाजपला रद्द करावी लागली. सध्या तरी हे सारं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलं आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आता भाजपच्या रथ यात्रेचं भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान, भाजपनं रथ यात्रा रद्द केली नसून ती पुढे ढकलली असल्याची माहिती यावेळी अमित शहा यांनी दिली. भाजपच्या वाढणाऱ्या राजकीय ताकदीला ममता बॅनर्जी घाबरल्या, त्यामुळे त्यांनी रथ यात्रेला परवानगी नाकारली. पण, भाजप आता कायदेशीर लढाई लढेल असं यावेळी अमित शहांनी सांगितलं.

पश्चिम बंगालमध्ये भाजप रथ यात्रा काढणार. त्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकणार नाही. शिवाय, पश्चिम बंगालमध्ये बदल घडवण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचं देखील यावेळी अमित शहा यांनी म्हणत ममता बॅनर्जींवर निशाणा साधला. शिवाय, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप मोठ्या संख्येनं विजयी होईल असा विश्वास देखील यावेळी अमित शहा यांनी बोलून दाखवला आहे. पण, रथ यात्रेवर आता सर्वोच्च न्यायालयामध्ये काय निर्णय देणार याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

वाचा – प. बंगालमध्ये भाजपच्या रथयात्रेला परवानगी नाही – SC

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -