घरदेश-विदेशममता मला दरवर्षी दोन कुर्ते आणि मिठाई पाठवतात

ममता मला दरवर्षी दोन कुर्ते आणि मिठाई पाठवतात

Subscribe

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील राजकीय लढत सर्वश्रूत आहे.दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. परंतु,पंतप्रधान मोदी आणि ममता यांच्यातील नवी बाब समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मला दरवर्षी दोन कुर्ते आणि मिठाई पाठवतात, असे स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले आहे. अभिनेता अक्षयकुमारला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी ही गोष्ट सांगितली. विरोधी पक्षातील नेत्यांशी असलेल्या वैयक्तिक संबंधांबद्दल मोदींना अक्षय कुमारने प्रश्न विचारला होता. तसेच काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यासोबतही माझे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे मोदींनी सांगितले. हे सांगितल्यामुळे मला राजकीय फटका देखील बसू शकतो असेही मोदी यावेळी म्हणाले.

नोटबंदी, जीएसटी, छापेमारीच्या विषयांवरून ममता बॅनर्जींनी मोदींवर अनेकदा प्रहार केला आहे. यावर बोलताना मोदींनी ममता बॅनर्जींविषयीचा हा किस्सा सांगितला. यावेळी मोदी म्हणाले की, राजकारणात माझे अनेक मित्र आहेत. विरोधी पक्षातील लोकांशीही माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना देखील मला वर्षातून तीन ते चार वेळा ढाका येथून मिठाई पाठवतात. ही गोष्ट जेव्हा ममता बॅनर्जींना समजली तेव्हापासून त्या देखील मिठाई पाठवू लागल्या, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यासोबत बोलण्यावरून पत्रकारांना दिलेल्या उत्तराचा घडलेला किस्सा देखील सांगितला. मोदी म्हणाले की, मी पहिल्यांदा संसदेत गेलो होतो त्यावेळी गुलाम नबी आझाद यांच्याशी गप्पा मारत होतो. त्यावेळी पत्रकारांनी ‘तुम्ही आरएसएसचे असूनही गुलाब नबी आझादांशी मैत्री कशी काय?’ असा प्रश्न केला होता. त्यावेळी गुलाम नबी आझाद यांनी तुम्ही बाहेर जे बघता तसे इथे चित्र नाही. आम्ही इथे एका कुटुंबासारखे राहतो, असे आझाद म्हणाले होते, असे मोदी यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -