घरदेश-विदेशअल्पवयीन मुलीवर बलात्कार; नराधम बापाला फाशी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; नराधम बापाला फाशी

Subscribe

सहा वर्षीय चिमूरडीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्या प्रकरणी एका नराधम बापाला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने या आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे.

आपल्या सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्या प्रकरणी अटक आरोपीला विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संक्षय असल्यामुळे ४२ वर्षीय  आरोपीने हे पाऊल उचलले. पत्नीवर संक्षय असल्याने ही मुलगी आपली नसल्याचे त्याला वाटत होते. आरोपीने पीडित मुलीबरोबर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन तिची निघृण हत्या केली. यानंतर त्याने मुलीला फासावर लटकवले असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. हत्याला आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न या आरोपीने केला. मात्र पोलीस तपासात त्याचे पितळ उघडे पडले. या आरोपीला पाक्सो कायद्या अंतर्गत अटक करण्यात आली होती.

आरोपीची करण्यात आली वैद्यकीय तपासणी

आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर मुलीची हत्या करण्या मागचे कारण पोलिसांनी तपासून काढले. दरम्यान पोलीसंनी पुराव्यासाठी आरोपीची वैद्यकीय तपासणी केली. मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे शवविच्छेदनात उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. न्यायालयासमोर आरोपीच्या डीएनएचे रिपोर्ट सादर करण्यात आले. या क्रूर आरोपीला मोठ्यात मोठी शिक्षा देण्याची मागणी न्यायाधिशांकडे करण्यात आली. अशा प्रकारे क्रूर हत्या करणाऱ्या बापाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी लोकांनी केली होती. न्यायालयाच्या या निर्णयाचा अनेकांनी स्वागत केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -