Friday, August 7, 2020
Mumbai
27.8 C
घर टेक-वेक गुगल मॅपमुळे पडला बर्फाच्या नदीत!

गुगल मॅपमुळे पडला बर्फाच्या नदीत!

Washington
Man blames Google Maps for falling into frozen river
गुगल मॅपमुळे पडला बर्फाच्या नदीत!

गुगल मॅपचा सध्या स्मार्टफोनमध्ये जास्त वापर केला जातो. गुगल मॅपचा वापर कोणतही ठिकाणी सहजरित्या शोधण्याकरिता केला जातो. मात्र काहीवेळा गुगल मॅपवर विश्वास ठेवल्यामुळे नुकसान होऊ शकते. असं काहीस अमेरिकेतल्या एका व्यक्तीसोबत घडलं आहे. गुगल मॅपच्या साहाय्याने तो इच्छित स्थळी जात असताना तो चक्क एका बर्फाच्या नदीत पडला. ज्यावेळी हा माणूस नदीत पडला त्यावेळी रात्रीचे ३ वाजले होते त्यामुळे आजूबाजूला कोणी मदत करण्यास देखील नव्हते. काही वेळानंतर एका व्यक्तीने त्या माणसाचा जीव वाचवला.

नक्की काय घडलं?

हा व्यक्ती मिनीयापोलिस या शहरात आला होता. मात्र त्याला त्याच्या हॉटेलाचा रस्ता माहित नव्हता. त्यामुळे त्याने गुगल मॅपची मदत घेतली. गुगल मॅपने त्याच्या हॉटेलचा रस्ता दाखवण्या ऐवजी बर्फ झालेली मिसिसिपी नदीचा मार्ग दाखवला. गुगल मॅपने दाखवलेल्या मार्गाने व्यक्ती गेल्यामुळे तो अचानक बर्फाच्या नदीत पडला. त्यानंतर त्याने जीव वाचवण्यासाठी स्थानिक फायर डिपार्टमेंटला फोन केला आणि अशाप्रकारे त्याचा जीव वाचला. त्याचा जीव वाचवलेल्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, गुगल मॅपने दगडांचा पुलावरुन नदी पार करण्याचा सल्ला दिला असावा. या व्यक्तीने चुकीचे जाणून घेऊन नदीवर चालायला सुरु केली असावी. सध्या हा व्यक्ती सुखरुप असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. गुगल मॅपमुळे अनेक व्यक्ती इच्छित स्थळी जाण्याचा ऐवजी चुकीच्या मार्गावर गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

भारतीयांसाठी गुगल मॅपचे खास फिचर्स 

गुगल मॅपने आता १५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे फीचर्समध्ये अपडेट केलं आहे. या नव्या फीचरमध्ये Explore, Commute, Save, Contribute and Updates या पाच टॅबचा समावेश करण्यात आला आहे. पूर्वी युजर्सना Commute, Explore हे दोन टॅबच केवळ वापरता येत होते. मात्र, आता या टॅबच्या मदतीने सर्व ठिकाणांची रेटींग, त्यासोबतच आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती मिळणार आहे. Commute टॅबच्या माध्यमातून एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी जवळचे आणि सोपे रस्ते कोणते आहेत हे पाहता येणार आहे. या टॅबकरीता युजर्सना आपले रोजच्या प्रवासाचे रूटीन सेट करावे लागणार आहे. गुगल मॅपने खास भारतीयांसाठी नवे फिचर्स आणले आहेत, याद्वारे युजर्सना त्यांच्या घरचा आणि ऑफिसचा पत्ता सेव्ह केल्यावर मॅपच्या सहाय्याने त्यांना वाहतूक कोंडी आणि पर्यायी रस्त्यांची माहिती मिळणार आहे. याद्वारे युजर्स आजुबाजूच्या जागांची माहिती मिळणार आहे. यातून व्यवसायिकाशी थेट संपर्क साधता येणार आहे. युजर्स या माध्यमातून केवळ रिव्हू किंवा रेटींग न देता व्हिडिओ देखील अपलोड करू शकतात. गुगलकडून, असे अनेक फिचर्स हे केवळ भारतीयांसाठी तयार करण्यात आले आहेत. यामध्ये दुचाकी मोड आणि प्रवासाचा वेळ देखील समाविष्ट आहे.


हेही वाचा – दिल्ली विधानसभा: व्हायरल झाला ‘बेबी केजरीवाल’