घरदेश-विदेशमाणुसकीचे दर्शन: हिंदू रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी त्याने सोडला रोजा

माणुसकीचे दर्शन: हिंदू रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी त्याने सोडला रोजा

Subscribe

रक्त मिळत नसल्यामुळे रुग्णाचे ऑपरेशन रकडले होते. पानुल्लाने एक यूनिट रक्त देवून रंजन गोगोई या रुग्णाचे प्राण वाचवले मात्र त्याला त्याचा रोजा तोडावा लागला.

एका हिंदू व्यक्तीसाठी मुस्लिम तरुणाने पवित्र रमझानचा उपवास मोडला आहे. कारण या हिंदू व्यक्तीचा जीव धोक्यात असून त्याचे प्राण वाचवण्यासाठी मुस्लिम तरुणाने रोजा सोडला आहे. आसामच्या मंगलडोईमध्ये ही माणुसकीचं दर्शन घडवणारी घटना घडली आहे. हिंदू व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी त्याला रक्ताची नितांत गरज असल्यानं २६ वर्षाच्या पानुल्ला अहमदनं रमझानचा उपवास मोडण्याचा निर्णय घेतला. शेवटी पानुल्लामुळे या हिंदू रुग्णाचे प्राण वाचले आहेत. सध्या या तरुणाचे सगळ्यांकडून कौतुक होत आहे.

रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी रक्ताची गरज

पानुल्ला अहमद त्याचा सहकारी आणि रुममेट तपश भगवती हे दोघे सोबत राहतात. त्याचा रुममेट भगवती चिंतेत होता. भगवती हा स्वैच्छिक रक्तदाच्या एका ग्रुपचा सदस्य आहे. त्याला ८ मे रोजी एक फोन आला होता की, धेमाजी जिल्ह्यातल्या रंजन गोगोई नावाच्या रुग्णाला रक्ताची गरज आहे. त्याला ओ पॉजिटिव्ह रक्तगटाचे दोन यूनिट रक्त हवे होते. गेल्या काही दिवसापासून ही व्यक्ती रक्ताच्या शोधात होती मात्र त्यांना रक्त मिळत नव्हते.

- Advertisement -

पानुल्लाचा सुरु होता रोजा

एका हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये काम करणाऱ्या भगवतीने त्याच्यापरिने अनेक प्रयत्न केले. मात्र त्याला ओ पॉजिटिव्ह रक्त काही सापडले नाही. भगवतीला माहिती होते की, त्याचा सहकारी पानुल्ला अहमद याचा रक्तगट तोच आहे. पानुल्ला त्याला मदत करु शकतो मात्र त्याचा रोजा सुरु होता. अशामध्ये जर त्याने रक्त दिले तर तो स्वत: आजारी पडेल असे भगवतीला वाटत होते.

धर्मापेक्षा माणुसकी महत्वाची 

गुवाहाटीच्या एका हॉस्पिटलमध्ये वार्ड बॉय म्हणून काम करण्याऱ्या पानुल्ला अहमदने भगवतीला चिंतेत पाहून त्याने त्याची विचारपूस केली. दरम्यान, भगवतीने दिलेल्या माहितीनंतर पानुल्ला रक्त देण्यास लगेच तयार झाला. त्याने त्याचा रमजानचा उपवास सोडण्याचा निर्णय घेतला. अशामध्ये भगवतीने पानुल्लाला समजवण्याचा प्रयत्न केला की, तू उपवास सोडला तर तुला खूप अशक्तपणा येईल. मात्र, पानुल्लाने एकाचा जीव वाचवण्यासाठी रक्त देऊन मदत करण्याच निश्चय केला. पानुल्लाच्या निर्णयामुळे भगवतीला खूप आनंद झाला. त्यानंतर दोघे जण ही रक्त देण्यासाठी आसामच्या एका हॉस्पिटलमध्ये पोहचले.

- Advertisement -

त्याच्या रक्तामुळे वाचले रुग्णाचे प्राण 

५० वर्षीय रंजन गोगोई या रुग्णाच्या पोटामध्ये ट्यूमर आहे. त्यांचे ऑपरेशन करायचे आहे त्यासाठी त्यांना ‘ओ पॉजिटिव्ह’ रक्ताची गरज आहे. रक्त मिळत नसल्यामुळे त्यांचे ऑपरेशन रकडले होते. पानुल्लाने एक यूनिट रक्त देवून रंजन गोगोई या रुग्णाचे प्राण वाचवले मात्र त्याला त्याचा रोजा तोडावा लागला. दरम्यान, गोगोई यांचे ऑपरेशन यशस्वी झाले असून त्याचे पूर्ण श्रेय ते पानुल्ला याला देत आहेत. गोगोई यांनी सांगितले की, पानुल्लाचे जेवढे आभार मानू ते कमीच आहे. एका अनोळखी व्यक्ती असताना त्यांनी मला मतद केली. तसंच पानुल्ला यांनी या बदल्यात काहीही घेण्यास नकार दिला.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -