घरदेश-विदेशरूग्णालयाचा ढिसाळ कारभार; त्याने 'आई'चा मृतदेह नेला बाईकवरून

रूग्णालयाचा ढिसाळ कारभार; त्याने ‘आई’चा मृतदेह नेला बाईकवरून

Subscribe

रूग्णालयाने रूग्णवाहिका देण्यास नकार दिल्याने मध्यप्रदेशातील तरूणाचे आपल्या आईचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी बाईकवरून नेला. साप चावल्याने त्याच्या आईचा मृत्यु झाला. जिल्हा रूग्णालयामध्ये फोन करून देखील त्यांनी रूग्णवाहिका देण्यास नकार दिला.

जिवंतपणी नाही किमान मेल्यावर तरी सरकारी योजनेचा लाभ मिळेल का हे माहित नाही! अशा प्रकारची प्रतिक्रिया अनेक जण देतात. यातून सरकारी यंत्रणांचा ढिसाळपणा दिसून येतो. असाच काहीसा प्रकार मध्यप्रदेशमध्ये समोर आला आहे. आईचा मृत्यू आणि शवविच्छेदनासाठी तिचा मृतदेह रूग्णालयात नेण्यासाठी रूग्णवाहिका मिळेना. अशावेळी आईचा मृतदेह दुचाकीवरून रूग्णालयात नेण्याची वेळ तरूणावर ओढावली. यावरून सरकारी यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराचा प्रत्यय येतो. आईच्या मृत्यूने आभाळ कोसळलेले. तर, दुसरीकडे सरकारी यंत्रणांच्या ढिसाळ कारभारामुळे आईच्या मृतदेहाची होणारी फरफट पाहण्याव्यतिरीक्त हाती काहीही नव्हते.

- Advertisement -

काय घडला प्रकार

मध्यप्रदेशातील टिकमगड येथील मुलावर अतिशय वाईट प्रसंग ओढावला. साप चावल्याने मुलाच्या आईचा मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबियांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करावे लागेल असे सांगितले. यावेळी मुलाने मृतदेह जिल्हा रूग्णालयात नेण्यासाठी फोन केला आणि रूग्णवाहिकेसाठी चौकशी केली. त्यावेळी जिल्हा रूग्णालयाने कोणतेही कारण न देता मुलाला रूग्णवाहिका नाकारली. वारंवार फोन करूनही जिल्हा रूग्णालयाने मुलाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. अखेर मुलाने आईचा मृतदेह दुचाकीवरून नेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने आपल्या आईचा मृतदेह बाईकवर ठेवून तो बांधला. आईचा मृतदेह घेऊन तरूण रूग्णालयात दाखल झाला. हा संपूर्ण प्रकार जिल्हाधिकाऱ्यांना कळाला. त्यानंतर त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतदेह बाईकवरून नेण्यासारखे प्रकार पहिल्यांदाच घडत आहेत असे नाही. यापूर्वी देखील पत्नीचा मृतदेह खांद्यावरून नेण्याचा प्रसंग ओडिसामधील एका व्यक्तीवर ओढावला होता. रूग्णालयाने रूग्णवाहिका देण्यास नकार दिल्याने तब्बल १० किमीपर्यंत दाना मांझी यांनी आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावरून नेला होता. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची १२ वर्षाची मुलगी देखील होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -