घरदेश-विदेशVideo: 'या' व्यक्तीने थेट सिंहासमोर मारली उडी आणि.....!

Video: ‘या’ व्यक्तीने थेट सिंहासमोर मारली उडी आणि…..!

Subscribe

या व्यक्तीनं सिंहाच्या पिंजऱ्यात उडी मारल्यानंतर तो काही काळ सिंहाच्या शेजारी चक्क बसून राहिला. तरी देखील सिंहाने त्याला काही केलं नाही.

दिल्लीच्या प्राणीसंग्रहालयातील थक्क करणारी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने चक्क सिंहाच्या पिंजऱ्यात उडी मारून तो सिंहाच्या शेजारी बसला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेतील व्हिडिओमध्ये तो व्यक्ती सिंहाच्यासमोर जाऊन बिनधास्त फिरताना दिसत आहे. दिल्लीतील प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. प्राणीसंग्रहालयातील असलेल्या पर्यटकांनी त्या व्यक्तीला जाण्यास रोखले. मात्र, त्याने धावत जाऊन सिंहाच्या पिंजऱ्यात उडी मारली.

- Advertisement -

रेहान खान (वय २८) असं या व्यक्तीचं नावं आहे. याने सिंहाच्या पिंजऱ्यात उडी मारल्यानंतर काही सेकंद तो सिंहाच्या शेजारी बसला. सिंह त्याच्याकडे काही काळ बघत होता. त्यानंतर तो झाडाच्या खाली बसून हातवारे करायला लागला. काही वेळानंतर सिंह त्याच्या अंगावर चढत होता. ही घटना रात्री साडे बाराच्या सुमारास घटली आहे. सध्या परिस्थिती सुखरूप असल्याचे प्राणीसंग्रहालयाच्या सूत्रांनी सांगितलं आहे.

रेहन खान

मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीला काहीच दुखापत झालेली नाही. निजामुद्दीन पोलीस ठाण्यात त्याची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी असं सांगितलं की, त्या व्यक्तीची मानसिक प्रकृती ठीक नाही आहे. या घटनेच्या व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्व नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर येऊ लागल्या आहेत. काही नेटकरी त्याला धैर्यशील म्हणतं आहे तर काही नेटकरी या घटनेला वेडेपणा बोलत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा महिलांना प्रसूती लाभ देणारे केरळ ठरणार पहिले राज्य


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -