घरताज्या घडामोडीलग्न मोडण्यासाठी 'त्याने' चोरले ब्लूटूथ स्पीकर

लग्न मोडण्यासाठी ‘त्याने’ चोरले ब्लूटूथ स्पीकर

Subscribe

गर्लफ्रेंडबरोबर लग्न करण्याची इच्छा नसल्याने व तिला स्पष्ट नकार देणे शक्य नसल्याने चीनमधील एका व्यक्तीने नामी शक्कल लढवली. त्याने लग्न मोडण्यासाठी चक्क ‘ब्लूटूथ स्पीकर’ चोरले व पोलिसांसमोर सरेंडर झाला. पोलिसांनी या अजब चोरीचे कारण विचारता त्याने लग्न मोडण्यासाठी चोरी केल्याचे कबुल केले. तसेच केलेल्या गुन्ह्यासाठी दंड भरण्याची तयारीही दर्शवली.

‘चेन’ असे या व्यक्तीचे नाव असून त्याचे वर्षभरापासून एका तरुणीबरोबर प्रेमसंबंध होते. दोघांचे लग्नही ठरले. पण नंतर मात्र त्यांच्यात सतत खटके उडू लागले. यामुळे चेन कंटाळला होता. काहीही करून त्याला हे लग्न करावयाचे नव्हते. तसेच स्पष्ट नकार देत गर्लफ्रेंडला दुखवायचेही नव्हते. यामुळे त्याने लग्न मोडण्यासठी चोरी करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे त्याची बदनामी होईल व त्याला अटक होईल आणि गर्लफ्रेंड नाराज होऊन स्वत:हून लग्न मोडेल. यामुळे तो शांघाय येथील एका डान्स स्टुडीओमध्ये गेला. तिथे गेल्यावर त्याने एका व्यक्तीचे ब्लूटूथ स्पीकर लंपास केले. पण स्टुडीओमधील सीसीटीव्हीत त्याचा फोटो कैद झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. ब्लुटूथ स्पीकरची किंमत २८७ डॉलर एवढी होती. पोलिसांनी चेनला चोरीचे कारण विचारले. त्यावेळी लग्न मोडण्यासाठी आपण चोरी केल्याचे चेनने सांगितले. सध्या चेन पोलिसांच्या ताब्यात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -