अधिकाऱ्याचं बिंग फुटलं! Corona चं कारण देत घरी जाणं टाळलं; पत्नीनं प्रेयसीसह रंगेहात पकडलं

रागात अधिकाऱ्याच्या पत्नीने थेट गाझियाबाद गाठलं

प्रातिनिधीक फोटो

देशभरात कोरोनाचा कहर सुरू असल्याने त्याचाच फायदा घेत अनेक दिवस कोरोना झाल्याचे कारण देत एक अधिकारी आपल्या घरी जाणे टाळत होता. हे अधिकाच्या पत्नीला लक्षात आले आणि त्याच्यावर असलेला तिचा संशय वाढला. यावेळी पत्नीला अधिकारी असलेल्या पतीचे अनैतिक संबंध असल्याचे बाहेरून समजले. या प्रकरणानंतर अधिकाऱ्याची पत्नी थेट नोएडाहून गाझियाबादला पोहोचल्याचा प्रकार उघड झाला आहे.

असा घडला प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील मुरादाबद येथे काम करत असलेला अधिकारी कोरोनाचे कारण देऊन घरी जाणं टाळत होता. स्वत: क्वारंटाइन असल्याने घरी येऊ शकत नाही, असा त्याने आपल्या पत्नीला निरोप दिला होता. मात्र अधिकारी आपल्या प्रेयसीसह गाझियाबादच्या राजनगर परिसरात एका प्लॅटवर राहात होता. ही गोष्ट पत्नीला समजल्यानंतर तिला राग अनावर झाला.

रागात पत्नीने थेट गाझियाबाद गाठलं

राग अनावर झालेल्या महिलेने थेट गाझियाबादमध्ये राजनगर गाठलं. या महिलेने पत्नीला प्रेयसीसोबत प्लॅटमध्ये पकडल्यानंतर अधिकाऱ्याने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केल्याचे सांगण्यात आले. या प्रकारामुळे त्या परिसरात मोठा गोंधळ उडाला. या प्रकरणाची महिलेने ट्वीट करून DGP आणि राज्यपालांना तक्रार दाखल केली आहे.

अधिकाऱ्याचं बिंग फुटलं

या प्रकारानंतर महिलेने असे सांगितले की, तिचा पती आठवड्यातून दोन वेळा नोएडा येथील त्यांच्या घरी यायचा. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांनी घरी येणंही बंद केले होते. त्यांना कारण विचारल्यावर कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगून होम क्वारंटाइन असल्याचा खोटा दावा केला आहे. परंतु याचाच शोध घेण्यासाठी जेव्हा पीडित पत्नी घटनास्थळी पोहोचली तेव्हा सत्य समोर आल्याचे तिने सांगितले. अधिकाऱ्याचं भांड फुटल्याने त्याने पत्नीला मारहाण केल्याचा आरोप पीडित पत्नीने केला आहे.

हिंदुस्तान समाचारने दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला गुजरातची असून २८ वर्षांपूर्वी या अधिकाऱ्यासोबत विवाह झाला होता. त्यांना २५ वर्षांची मुलगी आणि २० वर्षांचा मुलगा आहे. हा अधिकारी सध्या मुरादाबाद येथे तैनात असून तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा दावा करत होता. नोएडा येथे घरात दुसऱ्या महिलेसोबत राहात असल्याचा आरोप अधिकाऱ्याच्या पत्नीने केला.


‘सुशांत-दिशाच्या हत्येचे ‘डार्क वेब’द्वारे लाईव्ह टेलिकास्ट झाले होते’, वकीलाचा दावा