घरदेश-विदेशफेसबुकमुळे सापडले ४० वर्षांपूर्वी हरवलेले कुटुंबीय

फेसबुकमुळे सापडले ४० वर्षांपूर्वी हरवलेले कुटुंबीय

Subscribe

फेसबुकमुळे ४० वर्षांपूर्वी हरवलेले मोहम्मद आपल्या कुटुंबियांना सापडले आहेत. त्यामुळे मोहम्मद यांच्या कुटुंबियांनी फेसबुकचे आभार मानले आहे.

फेसबुकमुळे एका कुटुंबाला चार दशकांपासून हरवलेले कुटुंबप्रमुख सापडले आहेत. त्यामुळे या कुटुंबाने फेसबुकचे मनापासून आभार मानले आहे. वायल्पिडियाल मोहम्मद हे गृहस्थ गेल्या ३७ वर्षांपासून आपल्या कुटुंबापासून लांब राहत होते. ते कर्नाटकाच्या बेलगावी येथील एका बेकरीमध्ये काम करुन आपला उदरनिर्वाह करत होते. मोहम्मद यांचे शिक्षण न झाल्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाकडे परत जाता आले नाही. मात्र, रईस या तरुणाने त्यांची जीवनकथा फेसबुकवर टाकली आणि मोहम्मद यांना आपल्या घरची वाट मिळाली. गेल्या ३७ वर्षांपूर्वी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेच्या जवळ असणाऱ्या मादावूर या गावात त्यांची वाट चुकली होती आणि ते कुटुंबापासून लांब गेले होते.

३७ वर्षात मुलांचे आणि नातीचे झाले लग्न

मोहम्मद १९८२ साली मादावूर येथून हरवले होते. त्यावेळी त्यांच्या पत्नी गर्भवती होत्या. याशिवाय त्यांना एक मोठा मुलगा देखील होता. त्यांच्या पत्नी आणि भाऊंनी त्यांना शोधण्याचा भरपूर प्रयत्न केला. मात्र, त्यांना मोहम्मद सापडले नाही. अखेर काही महिन्यांनी कुटुंबियांनी मोहम्मद यांचा शोध घेणे थांबवले. या ३७ वर्षात मोहम्मद यांनी भरपूर मेहनत करुन आपला उदरनिर्वाह केला. त्यांचे कुटुंबिय कोझीकोडे येथे वास्तव्यास आहेत. या ३७ वर्षात त्यांच्या एका मुलाचे आणि दोन मुलींचे लग्न झाले. याशिवाय त्यांच्या एका नातीचे देखील लग्न झाले.

- Advertisement -

अशी झाली कुटुंबियांशी भेट

मोहम्मद यांना उतारवयात घरच्यांची आस लागली होती. त्यांची हीच जीवनकथा त्यांनी रईस या तरुणाला सांगितली. या तरुणाने त्यांची ती कथा फेसबुकवर टाकली. फेसबुकवर ही माहिती प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली. मोहम्मद यांची ही दुखभरी कहानी सैनुलबदीन यांनी फेसबुकवर वाचली. त्यांनी त्यांचे मित्र लोकतंत्रिक युवा जनता दलचे अध्यक्ष सलीम मदवूर यांची मदत घेऊन मोहम्मद यांच्या कुटुंबियांना शोधण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले. मोहम्मद यांच्या कुटुंबियांनी सलीम यांच्याशी संपर्क साधला. सलीम यांनी मोहम्मद यांचे भाऊ आणि मुलांना बेलगावी येथे बोलावले. त्यावेळी अत्यंत भावस्पर्शी असे वातावरण निर्माण झाले होते. याविषयी सलीम यांनी सांगितले की, ‘इतक्या वर्षांनी हरवलेले मोहम्मद यांची कुटुंबियांशी भेट झाली. ही खरच अत्यंत भावस्पर्शी अशी कथा आहे.’ मोहम्मद यांचा मुलगा अरब देशात आहे. त्याने फोनवर मोहम्मद यांच्याशी संवाद साधला. मोहम्मद यांना त्याचे बोल ऐकल्यावर भरुन आले. त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -