आणि पत्नी पॉर्नस्टार असल्याचा त्याला झाला भास!

बेंगळुरुमधील एका तरुणाला पॉर्न चित्रपट बघण्याचे व्यसन लागले होते. हे पॉर्न चित्रपट बघाताना त्यातील महिला आपली पत्नीच असल्याचा भास त्याला झाला.

Bangalore
man file complaint against his wife on doubt of work in porn movie
पत्नी पॉर्न फिल्ममध्ये काम करण्याच्या संशयावनरुन 'त्याची' पोलिसात तक्रार

काही आंबट शौकीन लोक इंटरनेटवर पॉर्न चित्रपट बघतात आणि त्यामध्ये वाहत जातात. दररोज असे चित्रपट पाहून त्यांना ते चित्रपट पाहण्याते व्यसन जडते आणि त्यात त्यांची बुद्धी भ्रष्ट होते. एक अशीच घटना बेंगळुरु येथे घडली आहे. बेंगळुरुमधील एका तरुणाला पॉर्न चित्रपट बघण्याचे व्यसन लागले होते. हे पॉर्न चित्रपट बघाताना तो त्या चित्रपटातील घडामोडी स्वत:च्या वास्तविक आयुष्याशी जोडू लागला. यामुळे आणखी गफलत वाढत गेली. त्याला पॉर्न चित्रपटातील महिला ही जणू आपली गर्भवती असलेली पत्नीच आहे, असा भास त्याला झाला. त्यामुळे त्याने याप्रकरणी पोलिसात धाव घेत स्वत:च्या पत्नी विरोधात तक्रार दाखल केली.

हेही वाचा – बायकोला दारूचं व्यसन, नवऱ्याची आत्महत्या!

पोलिसांच्या तपसणीत पत्नी निर्दोष

या इसमाने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासणी केली. त्यामध्ये तो व्हिडिओ भारताचा नसून विदेशाचा असल्याचे सिद्ध झाले. व्हिडिओमध्ये त्याच्या पत्नीसारखी दिसणारी महिला ही विदेशातील स्त्री होती. त्यामुळे पोलिसांच्या तपासणीत महिला निर्दोष असल्याचे सिद्ध झाले आहे. दरम्यान, पॉर्न चित्रपट बघितल्यापासून तो गर्भवती महिलेचा छळ करत होता. त्याने तिला पॉर्न चित्रपटात काम केले आहे का, असे देखील विचारले. यावर महिलेने स्पष्टपणे नकार दिला. तरीही त्याने तिला मारहाण केली. तिचा छळ केला. त्या इसमाचा महिनाभर हा सर्व प्रकार चालू होता. त्यानंतर त्याने पोलिसात तक्रार दाखल केली. महिला निर्दोष सुटल्यानंतर चिडून ती आपल्या पतीला सोडून माहेरी निघून गेली. पोलिसांनी या इसमाला मानसोपचारतज्ञाकडे दाखल केले आहे. त्याच्या मेंदूवर परिणाम झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा –बायकोच्या जाचाला कंटाळून ‘त्याने’ केली आत्महत्या

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here