घरदेश-विदेशझोपलेल्या परिचारिकांचे अश्लील चित्रीकरण करणाऱ्याला अटक

झोपलेल्या परिचारिकांचे अश्लील चित्रीकरण करणाऱ्याला अटक

Subscribe

गुडगाव पोलिसांनी आरोपी इसम आणि पेइंग गेस्ट मालकाला अटक केले आहे. आरोपीचा मोबाईल ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

झोपलेल्या परिचारिकांचे अश्लील चित्रीकरण केल्याप्रकरणी गुडगाव पोलिसांनी नुकतेच दोघांना अटक केले आहे. पीडित  परिचारिका पेइंग गेस्ट म्हणून सेक्टर-५ परिसरातील एका इमारतीत राहत असताना हा प्रकार घडला. ३ जूलै रोजी हा प्रकार घडला असून काल स्थानीक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परिचारिका झोपल्या असताना एक इसम खिडकीतून त्याचे चित्रीकरण करत असल्याचे त्यांना जाणावले. घाबरुन या परिचारिकांनी आरडा ओरड केली असता हा प्रकार उघडकीस आला. चित्रीकरण करणारा इसमही याच इमारतीत पेइंग गेस्ट म्हणून रहाणारा आहे. अश्लील उद्देशाने या इसमाने चित्रीकरण केल्याचा आरोप परिचारिकांनी केला आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपी इसम आणि पेइंग गेस्ट मालकाला ताब्यात घेतले आहे. या इसामाचा मोबाइल जप्त केला असून पुढील तपास सुरु केला आहे.

“आरोपी इसम हा याच पेइंग गेस्ट इमारतीत राहत असून पेइंग गेस्ट मालकाशी त्याची ओळख आहे. चित्रीकरण करत असताना परिचारिकांनी आरडा ओरड केल्यानंतर आरोपी इसम घटनास्थळावरुन पळ काढला. सदर घटनेबद्दल परिचारिकांनी पेइंग गेस्ट मालकाकडे तक्रार केली होती. मात्र त्याने या बद्दल काहीच केले नसल्यामुळे मुलींनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. मुलींच्या तक्रारीनंतर पेइंग गेस्ट मालक आणि आरोपी इसमा विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु आहे. इसमाने काढलेले व्हिडिओ मोबाईलमध्ये सापडले नाहीत.”- गुडगाव पोलीस अधीक्षक सुभाष बोकन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -