घरदेश-विदेशसॉक्सच्या वासामुळे इसमाला झाला फुफ्फुसाचा संसर्ग

सॉक्सच्या वासामुळे इसमाला झाला फुफ्फुसाचा संसर्ग

Subscribe

घाणेरड्या सॉक्सचा वास घेतल्यामुळे एकाला फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याची घटना घडली आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर ही बाब डॉक्टरांना लक्षात आले आहे.

बुटांमधील सॉक्स हे काही काळ सतत घातल्यानंतर त्याचा वास यायला लागतो. या वासामुळे इतरांनाही त्रास होतो. कुबट अशा वासामुळे आपण नाकावर हाथ धरतो. मात्र काही जणांना याची सवय असल्यामुळे त्यांना या वासाचा सहसा जास्त त्रास होत नाही. आरोग्याला घातक असलेल्या तंबाखूमुळे अनकदा फुफ्फुसाचा त्रास होतो. मात्र सॉक्सचा उबट वासही आरोग्याला घातक असल्याची माहिती पहिल्यांदाच समोर आली आहे. दक्षिण-चीनच्या फुझियान प्रांतातील झांगझोऊ येथून अज्ञात व्यक्तीला हा त्रास झाला असल्याचे वृत्त डेली मेलने दिले आहे. दरम्यान या व्यक्तीचा रुग्णालयात उपचार सुरु आहे. सॉक्सचा वास घेतल्यामुळे याव्यक्तीला हा त्रास झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 

lungs
रुग्णाचा एक्स रे (फोटो सौजन्य- टाइम्सनाव्ह न्यूज)

विचित्र सवय

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीला एक विचित्र सवय होती. कामावरून आल्यावर हा व्यक्ती आपल्या मोज्यांचा वास घेत होता. मोज्यांचा वास घेण्याची सवय असल्यामुळे त्याला हा उग्रवास सुंगधा सारखा येत होता. सतत वास घेतल्यामुळे त्याच्या फुफ्फुसाला संसर्ग झाला. श्वास घेऊ शकत नसल्यामुळे या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या फुफ्फुसाचा एक्स-रे काढल्यानंतर संसर्ग झाला असल्याचे डॉक्टरांना समजले. त्याला धूम्रपान करण्याची सवय नव्हती असे डॉक्टरांनी सांगितले आहे. 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -