घरदेश-विदेशत्याने पार्श्वभागात लपवलं सोनं; दिल्ली एअरपोर्टवर अटक

त्याने पार्श्वभागात लपवलं सोनं; दिल्ली एअरपोर्टवर अटक

Subscribe

परदेशातून सोने किंवा अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी तस्कर वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत असतात. अनेकजण यात यशस्वी ठरतात, तर काही पकडले जातात. तस्करी करताना पकडलेल्या गेलेल्यांच्या पद्धती पाहून सर्वसामान्यांना नेहेमीच आश्चर्याचा धक्का बसतो. असाच एक प्रकार राजधानी नवी दिल्ली येथे समोर आला आहे.
दिल्लीत सोन्याची तस्करी करण्यासाठी एका प्रवाशाने १ किलोचं सोनं चक्क आपल्या पाश्वभागात लपवून आणलं होतं. मात्र विमातळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे हा इसम पकडला गेला. पकडल्या नंतर यापूर्वीही अनेकदा त्याने अशाच प्रकाराने सोने तस्करी केल्याचं कबूल केलं.

या पूर्वीही अशाच प्रकारे केली होती तस्करी
सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवाशाने बुधवारी बँकॉक येथून दिल्लीकडे येणारी फ्लाईट पकडली होती. या प्रवाशाकडून ९९८ किलो (३१.०४ लाख किंमतीचे) वजनाचे सोने हस्तगत करण्यात आले आहे. विमानतळावर आल्यानंतर चेकपॉइंटला त्याच्या चहेऱ्यावर भितीचा भाव दिसल्याने अधिकाऱ्यांनी त्याला चौकशीसाठी बाजूला नेले असता हा प्रकार उघडकीस आला.
या पूर्वीही केलेल्या प्रवासादरम्यानही त्याने ३ किलोचे (९३.३२ लाख किंमतीचे) सोने तस्करी केल्याचे कबूल केले. सोन्याची तस्करी पकडण्यासाठी दुबईवरुन येणाऱ्या प्रवाशांवर विशेषतः लक्ष दिले जात असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

- Advertisement -

तस्करीच्या आणखी काही घटना
जानेवारी महिन्यात पटियाला येथील व्यापाऱ्याला स्वतःच्या पाकिटातून सोन्याची तस्करी करताना पकडले होते. ७०० ग्रॅम वजनाची सोनसाखळी आणि २३३ ग्रॅमचे ब्रेसलेट त्याने परिधान केले होते. तर त्याच्या पाकिटात ११६ ग्रॅमचं सोन्याचं बिस्कीट आणि १० ग्रॅमची सोन्याची नाणी असा ३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले.
याशिवाय मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरही एप्रिल महिन्यात सोन्याची तस्करी करत असलेल्या जोडप्याला अटक करण्यात आली होती. जमसिया करालील आणि तिचे पती सिद्दीक मुंडोदन अशी या दोघांची नावं होती. या दोघांकडून ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -