घरदेश-विदेशव्हिडिओ गेममध्ये हरला म्हणून केला गोळीबार

व्हिडिओ गेममध्ये हरला म्हणून केला गोळीबार

Subscribe

जॅक्सनविलेच्या कॉम्प्लेक्समध्ये बरेच गेम्स बार आहे.२० हून अधिक रेस्टॉरंट आहे आणि ७० हून अधिक दुकाने आहेत. ही घटना तेव्हा घडली ज्यावेळी एक मॅडन १९ टुर्नामेंटची क्वालिफाईंग राऊंड सुरु होता

अमेरिकेतील फ्लोरिडाच्या जेक्सनविले भागात एक धक्कादायक प्रकार घडला. येथील एंटरटेन्मेंट कॉम्पलेक्समध्ये एका तरुणाने व्हिडिओ गेम हरल्याच्या रागात गोळीबार केला. यात तिघांचा मृत्यू झाला असून ११ हून अधिक जण जखमी झाले आहे. विशेष म्हणजे हल्ला करणारा हल्लेखोर तरुणाचा देखील या गोळीबारात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या गोळीबारामागच्या कारणावर अजून शिक्कामोर्तब केले नाही. पण अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांनी ही बातम्यांनी या संदर्भातील एक व्हिडिओ जारी करत गेममध्ये हरल्यामुळे निराशेमुळे या तरुणाने हे कृत्य केल्याचे कळत आहे.

shooter-cruz-social-media-1
डेविड कॅटज, हल्लेखोर तरुण

हल्लेखोर तरुण २४ वर्षांचा

घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतल्यानंतर त्यांना तिघांचे मृतदेह आढळले. ज्यातील हल्लेखोराचे नाव डेविड कॅटज असे असून तो २४ वर्षांचा आहे. डेविडने गोळीबार करत नंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांना त्याच्या मृतदेहाशेजारी एक बंदूक देखील सापडली. त्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ११ जण जखमी झाले. जखमींना त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- Advertisement -

 

काय आहे एंटरटेन्मेंट कॉम्प्लेक्समध्ये ?

जॅक्सनविलेच्या कॉम्प्लेक्समध्ये बरेच गेम्स बार आहे.२० हून अधिक रेस्टॉरंट आहे आणि ७० हून अधिक दुकाने आहेत. ही घटना तेव्हा घडली ज्यावेळी NFL MADDEN १९ टुर्नामेंटची क्वालिफाईंग राऊंड सुरु होता.याची माहिती ड्रिनी गोज्का यांनी ट्विटरवरुन दिली. त्याने या ट्विटमध्ये त्यांनी या हल्ल्यात मला अंगठ्याला गोळी लागली.

- Advertisement -

व्हिडिओ गेम मुलांची मानसिकता बदलत आहे का? 

मुलाला शांत करण्यासाठी अनेकदा पालक त्यांच्या हातात फोन देतात. त्यावर मुल तासनंतास खेळत बसतात. या फोनला इंटरनेटची सुविधा असल्यामुळे अनेक जण ऑनलाईन गेम्सदेखील खेळतात. त्यामुळे मुले नेमकी काय खेळतात. कोणता गेम खेळतात यांंकडे पालकांचे लक्ष नसते. या खेळात ते इतके गुंततात की, त्यांची चीडचीड होते या चीडचीडचे रुपांतर मग रागात व्हायला लागते. तुमचे पाल्यही असे वागत असेल तर त्याकडे लक्ष द्या.

video_game
व्हिडिओ गेमच्या विळख्यात मुले? (सौजन्य- Getty image)

शैक्षणिक अभ्यासक्रमातच बदल झाल्यामुळे हल्ली मुले या टेक्नॉलॉजीशी जोडली गेली आहेत. यात इंटरनेटचा अॅक्सिसदेखील सहज उपलब्ध आहे. ऑनलाईन गेम खेळताना मुले अनेकदा अनोळखी व्यक्तिंशी चॅट करत असतात. यातून त्यांच्यातील इर्षा वाढत जाते आणि गेम जिंकायला ते अगदी कोणतेही हातखंडे वापरतात. त्यामुळे चीडचीड वाढते. रागावर त्यांना नियंत्रण ठेवता येत नाही. त्यामुळे तुमचा मुलगा ऑनलाईन कोणते गेम खेळतो ? याकडे पालकांनी अधिक लक्षात द्यायला हवे. 

हेमांगी म्हाप्रोळकर, मानसोपच्चारतज्ज्ञ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -