धक्कादायक: दिल्लीत शिक्षकाने केली पत्नी आणि ३ मुलांची हत्या

आरोपी गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता. त्याने शनिवारी मध्यरात्री १ च्या सुमारास चाकूने वार करुन चौघांची हत्या केली.

Delhi
man killed his wife and three children
शिक्षकाने केली पत्नी आणि ३ मुलांची हत्या

दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने त्याच्या पत्नी आणि तीन मुलांची निर्घृण हत्या केली आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांकडून आरोपी पतीची चौकशी सुरु आहे. उपेंद्र शुक्ला असं या आरोपी पतीचे नाव असून तो शिक्षक आहे. उपेंद्रने शनिवारी रात्री १ वाजता चाकूने वार करुन पत्नी आणि मुलांची हत्या केली. मृत मुलांमध्ये त्याची पत्नी, ७ वर्षाची मुलगी, ५ वर्षाचा मुलगा आणि दोन महिन्याची मुलगी यांचा समावेश आहे.

मानसिक तणावाखाली होता आरोपी

चौकशी दरम्यान आरोपी उपेंद्रने सांगितले की, तो गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली आहे. ज्या घरामध्ये त्याने पत्नी आणि मुलांची हत्या केली त्याच घरामध्ये त्याची सासू देखील राहते. उपेंद्र दरवाजा खोलत नसल्यामुळे तिने शेजारी राहणाऱ्यांना सकाळी याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी १०० नंबरवर फोन करुन पोलिसांना बोलावून घेतला.

आरोपीची चौकशी सुरु

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर दरवाजा तोडला. तर घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेली उपेंद्रची पत्नी आणि मुलं दिसली. आरोपीने हत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ज्यामध्ये त्याने हत्येसाठी स्वत:लाच जबाबदार ठरवले आहे. मात्र त्याने हत्येमागचे कारण लिहिले नही. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. सध्या त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

हेही वाचा – 

पतीच्या त्रासाला कंटाळून महिलेची स्वत:ला पेटवून आत्महत्या