धक्कादायक! पत्नीवर विवाहबाह्य संबंधाचा संशय; पतीने केले पत्नीच्या शरीराचे तुकडे

प्रातिनिधीक फोटो

आपल्या बायकोचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या संशयावरून चक्क पतीने आपल्या लग्नाच्या पत्नीच्या शरीराचे तुकडे तुकडे करून फेकून दिल्याचा प्रकार राजस्थानमध्ये घडला आहे.

नेमके काय आहे प्रकरण

२०१९ साली राजस्थानच्या अलवर भागात अमित गुप्ता या तरुणाने कोमल या महिलेशी लग्न केले होते. कोमलचे यापूर्वी घटस्फोट झाला होता. पहिल्या पतीशी विभक्त झाल्यानंतर तिने अमितशी लग्न केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, कोमलचे पहिल्या पतीच्या भाच्याबरोबर प्रेमसंबंध असल्याचा संशय अमितला होता. कोमल त्याच्या भाच्यासोबत फोनवर बोलायची म्हणून अमित तिच्यावर संशय घेत होता. यामुळे दोघांमध्ये वादही झाला होता.

गळा दाबून केली हत्या मग केले शरीराचे तुकडे

कोमलने तिच्या भाच्याला घराबाहेर हाकलले आणि हे अमितने पाहिले. तेव्हा त्याला खात्री पटली की खरच या दोघांचे प्रेमसंबंध आहे. तेव्हा अमितने कोमलला भांग पाजले कोमल बेशुद्ध झाल्यानंतर अमितने तिचा गळा दाबून खून केला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करून वेगवेळ्या ठिकाणी फेकून दिले.

चौकशीदरम्यान अमितने केला गुन्हा कबुल

कोमलच्या शरीराचे तुकडे पोलिसांना सापडले तेव्हा या मृतदेहाची ओळख पटवण्यास पोलिसांनी सुरूवात केली. यासह खुन्याला शोधण्याचा तपास सुरू केला. राजस्थान पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवायची होती आणि खुन्याला शोधायाचे आव्हान होते. मात्र राजस्थान पोलिसांनी कसून तपास केला असता अमित गुप्ताची पत्नी बेपत्ता झाल्याचे समोर आले. पोलिसांनी अमितची चौकशी केला तेव्हा अमितने गुन्हा कबुल केला.

यापुर्वी २०१३ साली अमितने आपल्या मैत्रीणवर बलात्कार करून तिचा खून केला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. नंतर अमित जामिनावर बाहेर पडला असल्याची माहिती मिळतेय.


मुख्यमंत्र्यांनंतर शरद पवारांना देखील आला धमकीचा फोन!