२ आठवड्यांत ‘त्या’ नराधमानं केले ३७ बलात्कार!

लंडनमध्ये तब्बल २ आठवडे सुरू असलेल्या बलात्कार सत्राचा आरोपी अखेर सगळ्यांसमोर आला असून त्या विकृताने केलेल्या गुन्ह्यांचे पुरावे पोलिसांनी लंडन न्यायालयात सादर केले.

London
Joseph McCann
हाच तो नराधम विकृत आरोपी जोसेफ मॅक्कन!

२ आठवड्यांचा काळ…११ ते ७१ वर्षांचे ११ पीडित…महिला, मुली आणि लहान मुलं…३७ वेळा बलात्कार…आणि पोलिसांनी अटक केल्यानंतर हा विकृत नराधम म्हणतो, ‘पहिल्या दोन बलात्कारांनंतर लगेच तुम्ही मला पकडलं असतं, तर पुढचे बलात्कार झालेच नसते’! या सगळ्यानंतर एकच प्रश्न उठू शकतो, इतकं नराधम, विकृत कुणी असू शकतं का? न्यायालयात या नराधमाच्या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना खुद्द न्यायाधीश देखील काही काळ सुन्न होऊन पाहात राहिले. एप्रिल महिन्यात लंडनमध्ये घडलेल्या भयानक घटनांची सुनावणी सध्या सुरू असून त्यामध्ये प्रमुख आरोपी जोसेफ मॅक्कनला कोर्टात हजर केल्यानंतर त्याच्या विकृतीचा पाढा वकिलांनी वाचून दाखवला आणि उपस्थित सगळ्यांनाच धक्का बसला.

पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार २० एप्रिल ते ५ मे या दोन आठवड्यांमध्ये मूळच्या हारोच्या ३४ वर्षीय जोसेफने ११ पीडितांवर ३७ वेळा बलात्कार केला. त्यामध्ये लहान मुले, अल्पवयीन मुली आणि अगदी ७१ वर्षांच्या वृद्ध महिलेचा देखील समावेश आहे. कधी चालत्या गाडीमध्ये महिलांचं अपहरण करून त्याने हे भीषण कृत्य केलं, तर कधी तरूणीच्या घरात शिरून तिच्या मद्यधुंद अवस्थेचा गैरफायदा घेत तिच्यावर अतिप्रसंग केला. एका वृद्धेला तिच्याच घरात इलेक्ट्रिक वायरींनी बांधून तिच्या अल्पवयीन मुलगी आणि मुलावर या विकृताने बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

दोन आठवडे लंडन अस्वस्थ होतं…

२१ एप्रिल – जोसेफने पहाटे वॅटफोर्डमध्ये एका २१ वर्षीय तरुणीचं नाईटक्लबजवळून अपहरण केलं. तिला म्हणाला, ‘महिलांना मारहाण करण्याच्या मी विरोधात आहे’ आणि तिच्याच बेडमध्ये तिच्यावर बलात्कार केला

२५ एप्रिल – लंडनमध्ये जोसेफनं एका २१ वर्षीय तरूणीचं दिवसाढवळ्या कारमध्ये अपहरण केलं. कारमध्ये आधीपासूनच एक २५ वर्षीय तरुणी होती जिला १४ तासांपासून त्याने कारमध्ये कोंडून ठेवलं होतं आणि त्या दोघींवर त्याने वारंवार बलात्कार केला

५ मे – हसलिंगडनमध्ये एका बारजवळून पहाटेच्या सुमारास जोसेफने एका वृद्ध मद्यधुंद महिलेचं अपहरण केलं. तिला तिच्या घरी घेऊन गेला. तिला वायरीने बांधून ठेऊन तिची १७ वर्षांची मुलगी आणि ११ वर्षांचा मुलगा या दोघांवर बाजूच्या खोलीत आळीपाळीने बलात्कार केला. यातल्या मुलीने घराच्या भिंतीवरून पळ काढला आणि त्याची तक्रार केली. तोपर्यंत जोसेफ फरार झाला होता

५ मे – त्याच दिवशी संध्याकाळी त्याने एका ७१ वर्षांच्या महिलेचं तिच्याच कारमध्ये अपहरण केलं. तिला चाकूची भिती दाखवून त्याने ५ तास शहरामध्ये कार फिरवत ठेवली. यादरम्यान तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. शिवाय एका १३ वर्षांच्या मुलीचं अपहरण करून त्याच कारमध्ये वृद्धेला ड्रायव्हिंग करायला लावून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.


जोसेफच्या गुन्ह्याचा पुरावा म्हणून सादर केलेले फोटो – 

https://www.dailymail.co.uk/news/article-7680937/Serial-rapist-Joseph-McCann-forced-mother-hear-raping-children.html#i-94565d71df5a04d1


असा सापडला जोसेफ!

शेवटी एका कारमध्ये त्याने अजून दोन मुलींचं अपहरण केलं. पण पोलिसांच्याच कारला तो धडकल्यानंतर त्याने कारमधून पळ काढला. तिथून एका दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊन त्याने टॅक्सी मागवली आणि त्यात बसून तो पळ काढणार होता. मात्र, एव्हाना पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी कडेकोट बंदोबस्त केला होता. सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने पोलीस त्याचा शोध घेत होते. संध्याकाळी ९ च्या सुमारास कॉगलेटन परिसरामध्ये एका टॅक्सीमध्ये तो सापडला आणि पोलिसांनी अखेर त्याला अटक केली. लंडनमध्ये २ आठवडे आपल्या विकृतीने महिलांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.


हेही वाचा – माकडाने चक्क मोबाईल उचलून केले सामान ऑर्डर; व्हिडिओ व्हायरल