फेस मास्क घालून मुलीला केले बेशुद्ध; अन् केला बलात्कार

Sexual abuse
बलात्कार

दिवसेंदिवस मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दररोज एक घटना ऐकायला येत असून नुकतीच एक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीला मास्क घालायला सांगून तिला बेशुद्ध करुन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पंजाबमध्ये घडली आहे. याप्रकरणी आरोपीला पंजाबमधील मोहाली येथील जिरकपुर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.

नेमके काय घडले?

पंजाबमधील मोहाली येथे एका लेबर कॉन्ट्रॅक्टरने अल्पवयीन मुलीला त्याच्या बांधकाम साइटवर मजुरीसाठी घेऊन गेला. त्यानंतर त्या मुलीला मास्क घालायला सांगितले. ते मास्क घालताच अल्पवयीन मुलगी बेशुद्ध पडली आणि त्या नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. ‘संत राज यादव असे आरोपीचे नाव असून तो लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतो. बांधकाम करण्यासाठी कामगार शोधणे आणि तिथे नेणे हे त्याचे काम आहे. या प्रकरणात अल्पवयीन बलात्कार पीडितेने पोलिसांना सांगितले आहे. तसेच ती पुढे म्हणाली की, ‘संत राजने तिला मजूर म्हणून बांधकाम ठिकाणी नेले आणि तिथल्या कोविड मार्गदर्शक सूचनांविषयी बोलताना एक मास्क दिला. जेव्हा मी मास्क घातला तेव्हा मला नशा झाल्याप्रमाणे गुंगी आली आणि नंतर माझ्यावर बलात्कार झाला’.


हेही वाचा – आता Corona Test करायची असेल तर आधार कार्ड असणार आवश्यक