घरदेश-विदेशसोने तस्कराची अनोखी शक्कल; विगमध्ये लपवले १ किलो सोने

सोने तस्कराची अनोखी शक्कल; विगमध्ये लपवले १ किलो सोने

Subscribe

एका सोने तस्कराने विगमध्ये १ किलो सोने लपवल्याचे उघडकीस आले आहे. या तस्कराला कोची विमानतळावर पोलिसांनी रंगेहात पकडले.

तस्करी करणारे काय शक्कल लढवतील, याचा नेम लावता येणार नाही. कोची विमानतळावर एका सोने तस्कराने विगमध्ये सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा हा प्रयत्न सीमा शुल्क विभागाने हाणून पडला. या सोने तस्कराचे नाव नौशाद असे आहे. तो केरळ येथील मल्लपूरमचा रहिवाशी आहे. शुक्रवारी तो शारजाह ते केरळ असा प्रवास करत होता. या दरम्यान कोची विमानतळावर त्याची तपासणी सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी केली. त्यावेळी विगमध्ये त्याने १ किलो सोने लपवल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी ताबडतोबड त्याला अटक केली.

हेही वाचा – चेन्नई विमानतळावर सोने तस्कर गजाआड!

- Advertisement -

पोलिसांना सोने तस्करीची मिळाली होती टीप

नौशादने अतिशय चतुराईने सोने विगमध्ये लपवले होते. त्याने डोक्याच्या मध्य भागातील केस मुळासकट कापले होते. मात्र, डोक्याच्या चारही बाजूंच्या कडेला असणारी केस त्याने कापले नाहीत. नौशादने अत्यंच चतुराईने डोक्याच्या मध्यभागी सोने ठेवले. मात्र, त्याच्या तस्करीबाबत कोची विमानतळाच्या सीमा शुल्क अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना अगोदरच टीप मिळालेली होती. त्यामुळे कोची विमानतळावर अत्यंत बारकाईने तपास सुरु होता. या तपासादरम्यान नौशाद कौची विमानतळावर पोहोचला. त्याच्या डोक्यावर धातू असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात त्याने विगमध्ये १ किलो सोने लपवले असल्याची बाब उघडकीस आले. नौशादची ही अनोखी शक्कल पाहुन पोलिसांनाही धक्का बसला. याअगोदरही एका कोकेन तस्कराने ही शक्कल लढवली होती. त्याने २४ लाखांचे कोकेन विगमध्ये लपवले होते. मात्र, बारसेलोना विमानतळावर तो तस्कर पकडला गेला होता.

हेही वाचा – सोन्याची पेस्ट करुन तस्करी करणारी महिला अटकेत

- Advertisement -

देशात सोने तस्करीत वाढ

गेल्या काही दिवसांपासून देशात सोने तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. याअगोदर जानेवारी २०१९ मध्ये चेन्नई विमानतळावर सीमा शुल्क विभागाने ८ कोटी किंमतीच्या २४ किलो सेन्याची तस्करी करणाऱ्याला अटक केली होती. नोव्हेंबर २०१८ मध्ये पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्कर करणाऱ्या एका महिलेला पुणे सीमाशुल्क विभागाने अटक केली होती. या महिलेने सोन्याची तस्करी करताना मोठी शक्कल लढवली होती. तिने पॉलिथिनच्या पिशवीतून सोन्याची पेस्ट आणली होती. तिच्या जवळ असलेल्या पॉलिथिनच्या पिशवीमध्ये २ किलो ७९१ ग्रॅम वजनाच्या सोन्याची पेस्ट आढळली होती. या सोन्याची किंमत ९० लाख ४४ हजार २३५ रुपये इतकी होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -