घरट्रेंडिंगआता याला काय म्हणावं! दात घासता घातसा आख्खा ब्रशच गिळून टाकला!

आता याला काय म्हणावं! दात घासता घातसा आख्खा ब्रशच गिळून टाकला!

Subscribe

बातमीचं शीर्षक वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे काय भलतंच? असं कसं होऊ शकेल? कुणी आख्खा ब्रश कसा गिळून टाकू शकतो? हा माणूस काय इतका झोपेत दात घासत होता का की त्याला कळलंही नाही आपण ब्रश गिळतोय म्हणून? पण विश्वास न बसणारा हा सगळा प्रकार खरोखर घडलाय तो भारताचं पूर्वेकडचं राज्य असलेल्या अरूणाचल प्रदेशमध्ये! अरुणाचल प्रदेशच्या दिबांग व्हॅली प्रदेशात जेव्हा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांसमोर ही केस आली, तेव्हा डॉक्टर देखील असेच अचंबित झाले. पण जेव्हा त्या माणसाची चाचणी केली, तेव्हा खरंच त्याच्या पोटात आख्खा ब्रश असल्याचं दिसलं. शेवटी नाईलाजास्तव त्याचं ऑपरेशन करून त्याच्या पोटातून तो ब्रश काढावा लागला. सुदैवाने ती व्यक्ती आता बरी असून लवकर रिकव्हर होत असल्याची माहिती रुग्णालयातल्या डॉक्टरांनी दिली!

नक्की झालं काय?

हा सगळा प्रकार घडला १५ सप्टेंबर रोजी. एका ३९ वर्षांच्या व्यक्तीने सकाळी दात घासताना त्याचा १९ सेंटिमीटरचा ब्रश गिळून टाकला. जीभ आतपर्यंत स्वच्छ करण्याच्या नादात त्याचा ब्रश थेट घशात गेला आणि त्रास होऊ लागल्यामुळे त्याच्याकडून अनावधानाने तो ब्रश गिळला गेला. अनेक प्रयत्न करून देखील हा ब्रश बाहेर न निघाल्यामुळे अखेर या व्यक्तीने परिसरातल्या बकिन पर्टिन जनरल हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. ब्रश गिळल्यामुळे त्याच्या अन्ननलिकेत तो सापडू शकतो, असा अंदाज लावून त्याचा एक्स-रे काढण्यात आला. पण आश्चर्याची बाब म्हणून त्यात ब्रश सापडलाच नाही.

- Advertisement -

अखेर डॉक्टरांनी ब्रश थेट पोटात गेल्याचा संशय येऊन त्याची लॅप्रोटोमी टेस्ट केली. तेव्हा कुठे या ब्रशचा ठावठिकाणा लागला. हा ब्रश अगदी निवांतपणे त्याच्या पोटात ‘आडवा’ झाला होता. पण विशेष म्हणजे पोटात गेलेल्या ब्रशचा त्या व्यक्तीला कोणताही त्रास जाणवत नव्हता! शेवटी ३० ते ३५ मिनिटं चाललेल्या ऑपरेशनमध्ये त्याच्या पोटातून हा ब्रश काढण्यात आल्याची माहिती त्याच्यावर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर बोमनी तायेंग यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -