घरदेश-विदेशपावसाचे पाणी तुंबले! सफाईसाठी BJP नगरसेवकाने स्वतः केले ड्रेनेज साफ!

पावसाचे पाणी तुंबले! सफाईसाठी BJP नगरसेवकाने स्वतः केले ड्रेनेज साफ!

Subscribe

फोटो व्हायरल झाल्यानंतर शेट्टी बनले सेलिब्रिटी

कर्नाटकातील मंगळुरु येथे भारतीय जनता पक्षाच्या एक नगरसेवक हे सोशल मीडियावर रातोरात स्टार बनले आहेच. सध्या त्यांचे फोटो खूप व्हायरल होत असून सर्वत्र त्यांचीच चर्चा सुरू आहेत. दरम्यान, शहरात झालेल्या वादळी पाऊसानंतर रस्त्यावर पावसाचे पाणी तुंबल्याने भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक मनोहर शेट्टी स्वत: गटारात उतरले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. तसेच ‘इट्स माय ड्यूटी’ म्हणत कर्नाटकमधील भारतीय जनता पक्षाच्या या नगरसेवकाने सर्वांसमोर एक आदर्श उदाहरण ठेवले आहे.

- Advertisement -

फोटो व्हायरल झाल्यानंतर शेट्टी बनले सेलिब्रिटी

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळूर येथील मनोहर शेट्टी असे त्या भाजप नगरसेवकाचे नाव असून गटारीत कचरा जमा झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. तसेच पादचारी नागरिकांनीही या त्रासाला सामोरे जावे लागत होते. ही परिस्थिती कळताच मनोहर शेट्टींनी महापालिका कामगारांना सांगितले. मात्र, पावसाळ्यात गटारीच्या आत जाणे धोकादायक आहे, असे सांगत कामगारांनी कामास नकार दिला. कामगारांनी एका मशीनच्या साहाय्याने पाणी काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र, तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. अखेर मनोहर शेट्टी स्वतःच गटारीत उतरले आणि पाण्याचा निचरा केला.यावेळी, शेट्टी हे कादरी दक्षिणेतील नगरसेवक आहेत. मॅनहोलमधून बाहेर पडताना कोणीतरी त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढले, त्यानंतर हे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर शेट्टी हे सेलिब्रिटी बनले आहेत.

- Advertisement -

पहिल्यांदाच निवडून आलेले शेट्टी हे नगरसेवक

मनोहर शेट्टी म्हणाले की, मी जेट ऑपरेटरला गटार साफ करण्यास सांगितली. मात्र, त्यांनी नकार दिला. कोणीही तयार होत नव्हते. म्हणूनच मी गटार साफ करण्याचा निर्णय घेतला. मी गटारात उतरल्याचे दिसताच माझ्या पक्षाचे अन्य चार कार्यकर्तेही माझ्या मदतीला आले. आम्ही फ्लॅशलाइटच्या मदतीने गटार स्वच्छ केले. तुंबलेल्या गटारीत अडकलेला कचरा आम्ही स्वच्छ केला. ज्यामुळे पाईपलाईन साफ ​​झाली आणि उर्वरित भागातून पाणी येऊ लागले. रस्त्यावर साचलेले पाणीही वाहून जाण्यास मदत झाली. मनोहर शेट्टी कादरी दक्षिणी सीटचे नगरसेवक असून ते पहिल्यांदाच निवडून आले आहेत.


अस्ताव्यस्त वाढलेले केस शिस्तीत येणार! २८ जूनपासून राज्यात सलून सुरू!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -