घरदेश-विदेश'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर मणिशंकर अय्यर यांचं स्पष्टीकरण

‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर मणिशंकर अय्यर यांचं स्पष्टीकरण

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नीच म्हणणाऱ्या वक्तव्याला एका वेबसाइटमध्ये लेख लिहून हे योग्य ठरवणाऱ्या काँग्रेस नेता मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नीच म्हणणाऱ्या वक्तव्याला एका वेबसाइटमध्ये लेख लिहून हे योग्य ठरवणाऱ्या काँग्रेस नेता मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना मणिशंकर अय्यर म्हणाले की, मी खेळात अडकणार नाही. मी मूर्ख आहे पण इतकाही मूर्ख नाही. लोकसभा निवडणुकांचे निकाल अवघ्या काही दिवसांवर असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी आपण पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आहे. मोदी नीच असल्याचा उल्लेख अय्यर यांनी केला होता. मणिशंकर अय्यर यांनी रायझिंग काश्मिर या वृत्तपत्रात याबाबत लेख लिहिला आहे.

- Advertisement -

तर दिलगिरी व्यक्त करतो

२०१७ मधील गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदींना नीच असं संबोधलं होतं. अय्यर यांच्या वक्तव्याचा फटका काँग्रेसला निवडणुकीतही बसला होता. त्यानंतर काँग्रेसने अय्यर यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. मात्र आजही आपण त्या वक्तव्यावर ठाम असल्याचं अय्यर यांनी सांगितलं. पाकिस्तानी रडारपासून वाचण्यासाठी ढगांचा आसरा घेण्याचा भारतीय वायुसेनेला सल्ला दिला होता. हे मोदींनी केलेलं वक्तव्य आश्चर्यकारकरित्या मूर्खपणाचं होतं, असं अय्यर म्हणाले. अशाप्रकारे अवैज्ञानिक दावे करताना मोदी वायुसेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मूर्ख समजतात का आणि निर्ढावलेल्या पंतप्रधानांची चूकही सुधारता न येण्याइतके हे अधिकारी भित्रे आहेत का?, असा प्रश्न अय्यर यांनी उपस्थित केला आहे. सर्वच स्तरातून झालेल्या टीकेनंतर मणिशंकर अय्यर यांनी माफी मागितली होती. मी इंग्रजीतील खालच्या दर्जाच्या शब्दाचा अनुवाद नीच असा केला होता. हिंदी ही माझी मातृभाषा नाही. तरीही चुकीचा अर्थ निघाला असेल, तर दिलगिरी व्यक्त करतो. असं म्हणत मणिशंकर अय्यर यांनी खेद व्यक्त केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -