घरट्रेंडिंगभारत- नेपाळ वादात मनीषा कोइरालाने घेतली नेपाळची बाजू म्हणाली...

भारत- नेपाळ वादात मनीषा कोइरालाने घेतली नेपाळची बाजू म्हणाली…

Subscribe

मनिषाने नेपाळची बाजू घेतल्यावर मात्र नेटकरी तीच्यावर चांगलेच भडकले आहेत.

नेपाळच्या नवीन नकाशावर भारतातील काही भागांवर दावा केला आहे. मात्र या नकाशावर भारताने आक्षेप घेतला आहे. याबाबत अभिनेत्री मनिषा कोयरालाने मात्र नेपाळची बाजू घेतली आहे. मनिषाने नेपाळची बाजू घेतल्यावर मात्र नेटकरी तीच्यावर चांगलेच भडकले आहेत. तर नेपाळच्या दाव्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, नेपाळकडून नवीन नकाशा जाहीर करणे सीमाप्रश्नाद्वारे चर्चेद्वारे सोडविण्याच्या द्विपक्षीय समजुतीच्या विरोधात आहे. त्याचबरोबर मनीषा कोइराला यांनी आपल्या देशाची प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यास सांगितले आहे.

- Advertisement -

मनिषा कोयरालाने ट्विट केले की, “आमच्या छोट्या देशाची प्रतिष्ठा कायम राहिल्याबद्दल धन्यवाद.  तीनही महान देशांमधील शांततापूर्ण आणि आदरपूर्ण संवाद आम्हाला हवा आहे. मनीषा कोईराला यांनी केलेल्या ट्विटवर चाहत्यांच्या बऱ्याच प्रतिक्रिया आहेत आणि त्यांच्यावर टीका देखील केली जात आहे.

- Advertisement -

 

भारताच्या सीमेच्या वादाच्या पार्श्वभूमीवर नेपाळच्या मंत्रिमंडळाने एक नवीन राजकीय नकाशा तयार केला आहे. ज्यामध्ये लिपुलेख, कलापाणी आणि लिंपियाधुरा यांना नेपाळच्या प्रदेशात दाखवण्यात आले आहे. परराष्ट्रमंत्री प्रदीपकुमार ज्ञवाली यांनी  सांगितले की, भारताशी सीमाप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नेपाळच्या सीमेवरील कलापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेख (लिपुलेख, कलापाणी आणि लिंपियाधुरा) यांना परत देण्याच्या मागणीसाठी नेपाळच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या खासदारांनीही संसदेत विशेष ठराव आणला होता.


हे ही वाचा – घटस्फोटीत महिलेवर तो करायचा बलात्कार, ‘लग्न करूयात’ म्हटल्यावर केला खून!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -