मनोहर पर्रिकरांचे साधे राहणीमान; विधान भवनात स्कूटरने जायचे

मनोहर पर्रिकर आपल्या साध्या राहणीमानीसाठी ओळखले जातात. मुख्यमंत्री बनल्यानंतरही मनोहर पर्रिकर यांनी आपल्या राहणीमानात फार बदल केले नाहीत. मुख्यमंत्री असूनही त्यांनी कधीही आपल्या पदाचा अहंकार बाळगला नाही.

Mumbai
manohar parrikar on scooter
मनोहर पर्रिकर यांचा साधेपणा

मनोहर पर्रिकर आपल्या साध्या राहणीमानासाठी ओळखले जायचे. मुख्यमंत्री बनल्यानंतरही मनोहर पर्रिकर यांनी आपल्या राहणीमानात फार बदल केले नाहीत. मुख्यमंत्री असूनही त्यांनी कधीही आपल्या पदाचा अहंकार बाळगला नाही. त्यांचे राहणीमान सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे होते. त्यांनी कुठल्याही गोष्टीचा बाऊ केला नाही. गोव्याचे मुख्यमंत्री बनल्यानंतरही ते मुख्यमंत्री भवन येथे राहायला गेले नाहीत. त्यांनी आपल्याच घरी राहणं पसंत केलं. एवढेच नाही, तर कधी एकेकाळी मनोहर पर्रिकर स्कूटरने विधान भवनात जायचे.

…तरीही नदीच्या पुलाची पाहणी करायला निघाले पर्रिकर

गेल्या काही महिन्यांपासून पर्रिकरांची प्रकृती खालावली होती. त्यांना कॅन्सर आजाराने वेढले होते. तरीदेखील त्यांच्यात काम करण्याची जिद्द आणि कर्तव्य तत्परता अफाट होती. डिसेंबर २०१८ मध्ये मांडवी नदीवर पुलाच्या बांधकामाचे काम सुरु होते. या कामाच्या पाहणीसाठी पर्रिकर स्वत: दाखल झाले होते. त्यावेळी पर्रिकरांना पाहून अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या होत्या.

पर्रिकर गोव्यातील पहिले भाजप मुख्यमंत्री

मनोहर पर्रिकर गोव्यातील पहिले भाजपचे मुख्यमंत्री ठरले होते. आतापर्यंत ते तीन वेळा गोवा राज्याचे मुख्यमंत्री झाले. याशिवाय देशाचे केंद्रिय संरक्षण मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here