घरदेश-विदेश१ एप्रिलपासून तुमच्या आयुष्यात 'हे' बदल होणार

१ एप्रिलपासून तुमच्या आयुष्यात ‘हे’ बदल होणार

Subscribe

१ एप्रिलपासून तुमच्या आयुष्यात महत्त्वाचे बदल होणार आहेत. हे बदल तुमची नौकरी, पॅन कार्ड, प्रॉपर्टी, जीएसटी, बँक, ईपीएफ संदर्भात असणार आहेत.

१ एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होते. या दिवसापासून वेगवेगळे कायदे बदलतात. त्यामुळे यावर्षीही १ एप्रिलपासून बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत. बरेच नियम येणार आहेत. या नियमंविषयी माहिती तुम्हाला होणे जरुरीचे आहे. हे बदल तुमची नौकरी, पॅन कार्ड, प्रॉपर्टी, जीएसटी, बँक, ईपीएफ संदर्भात असणार आहेत.

पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक कराच

जीएसटी संदर्भात महत्त्वाचे नियम १ एप्रिल पासून बदलण्यात येणार आहेत. यामध्ये कंपोजिशन स्कीम आणि रियल इस्टेटच्या स्वस्त दरांचा समावेश आहे. त्याचबरोबर पॅनकार्ड आणि आधारकार्डला लिंक केल्याशिवाय तुम्हाला टॅक्स रिफंड मिळणार नाही. यासोबतच रिझर्व्ह बॅंकेच्या व्याजदरासंदर्भात महत्त्वाचे निर्णय लागू होणार आहेत. सेबी म्युचूअल फंड संदर्भात महत्त्वाचे निर्णय १ एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहे. या निर्णयानुसार म्युच्यूअल फंड कंपन्या ग्राहकांकडून फंड मॅनेज करण्यासाठी जो चार्ज लावतात त्याची रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

१ एप्रिलपासून लागू होणारे महत्त्वाचे निर्णय

  • नौकरी बदलल्यावर ऑटोमॅटीक पीएफ अकाउंट दुसऱ्या कंपनीत ट्रान्सफर होणार. त्यासाठी ईपीएफओला अर्ज करण्याची गरज नसेल.
  • संपूर्ण देशात वीजेचे मीटर प्रीपेड पद्धतीने सुरु होणार. हे मीटर मोबाईल रिचार्ज सारखे काम करणार आहे. त्यामुळे ग्राहकांना जितकी वीज लागेल, तितकेच रिचार्ज करता येईल.
  • रियल ईस्टेटमध्ये जीएसटीचे नवे नियम लागू होतील. स्वस्त घरांवर १ टक्के आणि अंडर कंस्ट्रक्शन प्रॉपर्टीवर ५ टक्के जीएसटी लागणार.
  • कंपोजिशन स्कीमसाठी १.५ कोटी रुपयांची सीमा लागू होतील. जीएसटी रजिस्ट्रेशनसाठी नवी मर्यादा ४० लाख रुपयांची होणार आहे.
  • सगळ्या बँकांना व्याजदर ठरवण्यासाठी एक वेगळ्या मार्गाचा अवलंब करावा लागेल. व्याजदराला एक्सटरनल बँचमार्कसोबत लिंक करावं लागणार आहे.
  • पॅनकार्डला आधारशी लिंक करण्यासाठी शेवटची तारीख ३१ मार्च २०१९ आहे. जर आधार लिंक केले नाही तर १ एप्रिलपासून तुम्हाला टॅक्सचा रिफंड मिळणार नाही.
  • जर तुम्ही कनेक्टिंग ट्रेनची बुकिंग केली असेल तर आणि तुमची एक ट्रेन सूटली तर रेल्वे तुम्हाला रिफंड देईल. तुम्हा २ पीएनआरसोबत लिंक करु शकणार आहेत.
  • 125 सीसी पेक्षा जास्त सीसी असणाऱ्या बाईकच्या कंपन्यांना अॅंटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम जरुरी असणार आहे. १२५ सीसीच्या बाईकला कॉम्बी ब्रेक सिस्टीम असणं जरुरीचे असणार आहे.
  • मारुती सुजुकीची अर्टिगा कारचे उत्पादन बंद होणार आहे. या कारची बुकिंग बंद होणार आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -