घरदेश-विदेशथँक्स टू पीएम अनेक कुटुंबांनी मानले मोदींचे आभार

थँक्स टू पीएम अनेक कुटुंबांनी मानले मोदींचे आभार

Subscribe

रविवारचा जनता कर्फ्यू सुरू झाला आणि ‘थँक्स टू पीएम मोदीजी’ अशी प्रतिक्रिया सध्या घराघरांमधून ऐकायला मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यू घोषित केल्यामुळे संपूर्ण देशात संचारबंदी लागू झाली आणि रविवारी मुंबई आणि उपनगरातील अनेक घरांत कुटुंब सदस्य प्रथमच एकत्र होते. भौतिक सुखाच्या शोधात व्यस्त असणार्‍या आईवडिलांचा एकत्र सहवास लाभलेली मुले, सुट्टीच्या दिवशीही घरातील ज्येष्ठ व्यक्तींना घरी ठेवून बाहेर जाणारी कर्ती माणसे रविवारी प्रथमच घरात होती. त्यामुळे घरातील व्यक्तींशी तुटलेला संवाद झाला. राजकारणापासून समाजकारणापर्यंत गप्पा झाल्या. जनता कर्फ्यूमुळे एकत्र आल्याने अनेक कुटुंबांसाठी रविवारचा दिवस आनंदाचा ठरला होता.

‘करोना’चा प्रसार जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात पसरु लागल्यामुळे या साथीच्या आजाराच्या प्रसाराची श्रृंखला तोडण्याच्या दृष्टीकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू जाहीर केल्यामुळे रविवारी प्रत्येकाने घरीच राहत स्वत:ला बंदिवान केले. त्यामुळे एरव्ही सुट्टीच्या दिवशी घरी दर्शन न होणार्‍या आई-बाबा, ताई-दादा, काका-काकी, आत्या आदी सर्व मंडळी यानिमित्ताने का होईना घरी थांबले आणि सर्व कुटुंब एकत्र येण्याची संधी मिळाली. ‘करोना’ आजारांच्या रुग्ण सेवेसाठी झटणारे डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉय, आयाबाई, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच सरकार आणि महापालिका, नगरपालिकांच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता सर्वच कुटुंबे आदी एकत्र जमले होते. त्यामुळे अनेक कुटुंबांसाठी हा सुवर्णदिन होता. या माध्यमातून का होईना घरातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना घरीच थांबवून एकमेकांशी संवाद आणि गप्पागोष्टी करण्याची संधी मिळाली. एका बाजूला करोनाचे मोठे संकट असतानाच दुसरीकडे या माध्यमातून मिळालेला सुखद अनुभव प्रत्येक कुटुंबातील सदस्यांच्या चेहर्‍यावर आनंद देवून जात होता. त्यामुळेच प्रत्येक कुटुंबातील सदस्यांच्या मुखावर नकळत प्रतिक्रिया उमटली जात होती.

- Advertisement -

खरंतर करोनासारखे मोठे संकट देशावर आहे. त्यामुळे काहीशा सक्तीने देशातील नागरिकांना घरात बसावे लागत आहे; पण त्याची एक सकारात्मक बाजूही पुढे आली आहे. अनेकदा इच्छा असतानाही कामाच्या, कौटुंबिक जबाबदारीच्या सक्तीमुळे घरातील सदस्य एकत्र येत नाहीत. मात्र जनता कर्फ्यूमुळे प्रत्येकाला एकत्र येण्याची संधी मिळाली. त्यातून तुटलेला संवाद पुन्हा सुरू झालेला पाहायला मिळाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -