नक्षलवाद्यांचा सुरक्षा दलावरील हल्ल्याचा कट सीआरपीएफनं उधळला

छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात अरनपूर ते निलवायाच्या रस्त्यावर सुरक्षा दलाच्या ताफ्याला लक्ष्य करण्याचा प्रयत्न नक्षलवाद्यांनी केला. पण, सीआरपीएफच्या जवानांनी त्या मार्गावरून जाण्यापूर्वी आयईडी बॉम्ब निष्क्रिय केले.

mumbai
नक्षलवादी

छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात अरनपूर ते निलवायाच्या रस्त्यावर सुरक्षा दलाच्या ताफ्याला लक्ष्य करण्याचा प्रयत्न नक्षलवाद्यांनी केला. यावेळी नक्षलवाद्यांनी भुसुरूंग स्फोटाद्वारे दोन ठिकाणी आयईडी बॉम्ब पेरून ठेवले होते. पण, सीआरपीएफच्या जवानांनी त्या मार्गावरून जाण्यापूर्वी आयईडी बॉम्ब निष्क्रिय केले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. यापूर्वी देखील नक्षलवाद्यांनी अशाच प्रकारे गडचिरोलीत जवानांच्या ताफ्याला लक्ष्य केले होते. त्यामध्ये १५ जवान शहीद झाले होते. पण, आता सीआरपीएफच्या जवानांच्या सतर्कतेमुळे मात्र नक्षलवाद्यांचा मोठा कट उधळला गेला.

असा झाला प्लॅन

छत्तीसगड आणि गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचे चार-पाच दल एकत्र येऊन एक कंपनी तयार करण्यात आली. जवानांना सापळ्यात अडकवण्यासाठी दानापुर येथे वाहनांची जाळपोळ केली. शीघ्र कृती दलाचे जवान खासगी वाहनातून निघाले असता, त्याची प्रत्येक माहिती खबऱ्यांमार्फत नक्षलवाद्यांपर्यंत पोहोचत होती. नक्षलवाद्यांच्या स्थानिक दलाने हल्ल्याचा कट रचला आणि इतर दलाची मदत घेतली. हल्ला केल्यानंतर लगेच नक्षलवादी दंडकारण्यात पळून गेले. दंडकारण्य हे छत्तीसगड, महाराष्ट्र आणि झारखंड या तीन राज्यांच्यामध्ये असलेलं घनदाट जंगल आहे आणि इथे केवळ नक्षलवादीच जातात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here