घरताज्या घडामोडीनवरीच्या आईला घेऊन नवरदेवाचे वडील फरार, लग्न बोंबलले

नवरीच्या आईला घेऊन नवरदेवाचे वडील फरार, लग्न बोंबलले

Subscribe

मुलांचे लग्न ठरवताना आई वडिलच प्रेमात पडले.

गुजरातमधील सूरत येथे बॉलीवूड चित्रपटातील कथेला शोभावे असे एक प्रकरण घडले आहे. मुलांची लग्न ठरवताना अचानक एक्स प्रेयसी व प्रियकर समोरा समोर आले आणि जुने प्रेम पुन्हा बहरले. यातील प्रेयसी (४६) ही नवरीची आई असून प्रियकर (४८) हे नवरदेवाचे वडील आहेत. हे प्रेमीयुगल घरातून पळून गेले आहेत. यामुळे मुलांचे लग्न बोंबलले असून दोन्ही कुटुंबांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

यातील नवऱ्यामुलाचे घर कातरगाम भागात असून वधू नवसारीची आहे. पण या दोघांचे लग्न जुळवताना यांचे आई वडील एकमेकांना आधीपासूनच ओळखत असल्याचे समोर आले. मात्र त्यांच्यात प्रेमसंबंध होते. याबद्दल कोणासही काही माहित नव्हते. यादरम्यान, दोघांमध्ये पुन्हा जवळीक झाली. त्यानंतर एक वर्षापूर्वी मुलांचा साखरपुडाही झाला. पण तरीही वरपित्याने व वधूच्या आईने त्यांचे संबंध उघड केले नाहीत. येत्या २ फेब्रुवारीला मुलांचे लग्न आहे. त्यामुळे घरात लग्नाची सरबराई सुरू आहे. याचदरम्यान, अचानक नवरदेवाचे वडील व नवरीची आई घरातून बेपत्ता झाली. यामुळे घरातल्यांनी शोधाशोध केली असता. दोघे पळून गेल्याचे समोर आले. आई वडिलांच्या या लव्हस्टोरीमुळे मुलांनी मात्र लग्न मोडले असून पालक बेपत्ता असल्याची पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -