घरदेश-विदेशनवरा नवरी मांडवातून निघाले आणि......

नवरा नवरी मांडवातून निघाले आणि……

Subscribe

हे नवविवाहित जोडप लग्न करून जात होत. पण अचानक एका ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली आणि या भीषण अपघातात या नवविवाहित जोडप्याचा मृत्यू झाला.

टेक्सास या शहरात नुकतंच लग्न झालेल्या जोडप्याचा भीषण अपघातात मृत्यू झाला. पती हार्ले मॉर्गन आणि पत्नी रायनॉन बौद्रेक्स असं या मृत्यू झालेल्या जोडप्याचे नाव आहे. त्याच्या कारला एका ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे ते दोघं जागीच ठार झाले आहेत. लग्न सोहळा पूर्ण करून हे दोघं घरी जात असताना हा भीषण अपघात घडला. वराच्या आईने असं सांगितलं की, त्यांचे लग्न होऊन पाच मिनिटं देखील झाले नव्हते. माझ्या डोळ्यासमोर माझ्या दोन बाळाचा मृत्यू पाहावा लागला, असं त्या म्हणाल्या.

पती हार्ले मॉर्गनचे हा १९ वर्षांचा होता, तर पत्नी रायनॉन बौद्रेक्स ही २० वर्षांची होती. शुक्रवारी या नुकतचं लग्न झालेल्या जोडप्याला पोलिसांनी मृत घोषित केलं आहे. ऑरेज टेक्सासच्या पोलिसांच्या माहितीनुसार, सर्व कुटुंब या नव्या जोडप्याचे स्वागत करण्यासाठी घरी जात होते. तसेच सगळे जोडप्याच्या कारच्या मागेच होते, असं पोलिसांनी सांगितलं.

- Advertisement -

तसेच जेव्हा जस्टीस ऑफ द पीस बिल्डिंगच्या गेटवरून या नवविवाह झालेल्या जोडप्याची गाडी बाहेर आली. ही गाडी नवरदेव चालवत होता. त्याचवेळी या ट्रकरने कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी मोठी होती की, गाडी ही कोणत्याही खड्ड्यात वैगेर थांबली नाही. ती फार वेळ पलटी होत गेली आणि ती एका रस्ताच्या बाजूला पडली, पोलीस कीथ लाँगलोइस यांनी सांगितलं.

कीथ लाँगलोइस असं म्हणाले की, अजून पर्यंत ट्रक चालकाची ओळख पटली नसून सध्या त्याचा तपास सुरू आहे. ट्रक चालकाची ड्रग आणि अल्कोहोल चाचणी घेण्यात येईल, असं ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -