घरदेश-विदेशMaruti Suzuki ने कोरोनाच्या बचावासाठी तयार केल्या 'या' वस्तू! जाणून घ्या किंमत

Maruti Suzuki ने कोरोनाच्या बचावासाठी तयार केल्या ‘या’ वस्तू! जाणून घ्या किंमत

Subscribe

मारुती सुझुकीने ग्राहकांसाठी कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी मास्क, हातमोजे आणि इतर उत्पादने बनवण्यास सुरुवात केली आहे

देशातील सर्वात मोठी कार तयार करणारी कंपनी मारुती सुझुकीने ग्राहकांसाठी कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी मास्क, हातमोजे आणि इतर उत्पादने बनवण्यास सुरुवात केली आहे. या उत्पादनांची किंमत १० रुपयांपासून पुढे आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस सरकारने लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याची घोषणा केली. त्याचबरोबर सरकारने अनलॉक -१ मध्ये अनेक सवलती देखील दिल्या आहेत.

नवीन अ‍ॅक्सेसरीज लाँच

लॉकडाऊन दरम्यान, अनेक वाहन कंपन्यांनी व्हेंटिलेटर बनविण्यासाठी कंपन्यांशी भागीदारी करुन वैद्यकीय उपकरणं बनवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कंपन्यांनी फेसमास्क, फेसशील्ड यासारख्या उत्पादनांची निर्मिती करण्यासही सुरूवात केली आहे. यासह मारुतीनेही कारसाठी नवीन अ‍ॅक्सेसरीज लाँच केल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध

मारुती कंपनीच्या वेबसाइटवरील मारुती सुझुकी जेन्युइन अॅक्सेसरीज श्रेणीमध्ये या सर्व वस्तू आरोग्य आणि स्वच्छता कॅटेगरी उपलब्ध आहेत. कंपनीने सांगितले की, कोरोना व्हायरसच्या साथीच्या काळात त्याने ग्राहकांसाठी मास्क, हातमोजे, चेहरा झाकण्याचे काही साधनं यासह इतर उत्पादनंही बनविली आहेत. कंपनीच्या ‘आरोग्य आणि स्वच्छते’शी संबंधित ही उत्पादनं कार आणि वैयक्तिक सुरक्षेसाठी आहेत. त्याची किंमत १० रूपयांपासून ते ६५० रुपयांपर्यंत आहे.

अशा वस्तूंची कंपनीने केली निर्मिती

मारुती कंपनीच्या मते, या उत्पादनांमध्ये फेस मास्क, कव्हर टू कव्हर शूज, ग्लोव्हज आणि ‘फेस शील्ड’ यांचा समावेश आहे. ग्राहक जवळच्या मारुती शोरूम किंवा वेबसाइटवर ऑनलाइन भेट देऊन या नवीन उत्पादनांविषयी माहिती मिळवू शकतात. ग्राहकांमधील विश्वास अधिक बळकट करण्यासाठी ‘आरोग्य आणि स्वच्छता’ या प्रकारात अधिक उत्पादने सादर करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

- Advertisement -

मारुती सध्या आपल्या आरोग्य आणि स्वच्छता प्रकारात १४ उत्पादने तयार करीत आहे. तीन प्लाय फेसमास्क, डिस्पोजेबल शू कव्हर, फेस व्हिजर्स, डिस्पोजेबल आय गीअर्स, कार पार्टिशन इत्यादींचा समावेश आहे.


दुकाने, बाजारपेठा उद्यापासून सुरू; कन्टेनमेंट झोन वगळता अन्यत्र मोकळीक
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -