घरदेश-विदेशतालिबानचा म्होरक्या रावळपिंडीमध्ये ठार

तालिबानचा म्होरक्या रावळपिंडीमध्ये ठार

Subscribe

जमैत - उलेमा - इस्लाम - सामीचा म्होरक्या मौलाना - सामी - उल -हकचा मृत्यू झाला आहे. मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञातांनी केल्ल्या हल्ल्यात मौलाना - सामी - उल -हकचा मृत्यू झाला.

गॉडफादर ऑफ तालिबान म्हणून ओळखला जाणारा जमैत – उलेमा – इस्लाम – सामीचा म्होरक्या मौलाना – सामी – उल -हकचा मृत्यू झाला आहे. रावळपिंडी येथे मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञातांनी केल्ल्या हल्ल्यात मौलाना – सामी – उल -हकचा मृत्यू झाला. या हल्ल्यामध्ये मौलाना – सामी – उल -हकचा ड्रायव्हर आणि बॉडिगार्ड देखील जखमी झाला आहे. दरम्यान, मौलाना – सामी – उल -हकला दवाखान्यात नेताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. मौलाना – सामी – उल -हकहा पाकिस्तानच्या सिनेटचा सदस्य देखील होता. त्यानं १९८५ ते १९९१ आणि १९९१ ते १९९७ या काळात सदस्यपद भूषवलं होतं. अनेक तालिबानी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यामध्ये मौलाना – सामी – उल -हकचा हात आहे. मौलाना – सामी – उल -हकचा मृत्यू हा दहशतवाद्यांसाठी मोठा धक्का आहे. मौलाना – सामी – उल -हकहा पाकिस्तानी सैन्याच्या अंत्यत जवळचा असा मानला जात होता. तरूणांना हेरून त्यांना प्रशिक्षण देण्यात देखील तो अग्रेसर होता. पख्तुनख्वा या भागातील दरूल उलम हक्कानिया या मदरशांच्या प्रमुखपदाची जबाबदारी देखील मौलाना – सामी – उल -हकनं निभावली. अनेक दहशतवादी घडवण्यामध्ये मौलाना – सामी – उल -हकचा हात होता त्याचं उदाहरण म्हणजे मुल्ला ओमर हा दहशतवादी होय. रशियाविरोधात अनेक तालिबांनी दहशतवाद्यांनी बंदुक हातात धरली. त्यामध्ये देखील मौलाना – सामी – उल -हकनं त्यांना उद्युक्त करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -