घरदेश-विदेशमायावतींची लोकसभा निवडणुकीतून माघार

मायावतींची लोकसभा निवडणुकीतून माघार

Subscribe

राजकारणात अनेक मोठ मोठे निर्णय घ्यावे लागतात. सध्या देशाचे हित आणि पार्टीची चळवळ पाहता, यंदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला, असल्याचे मायावती यांनी सांगितले.

बहुजन समाजवादी पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे मायावती यांनी स्पष्ट केले आहे. बुधवारी आजोयित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यामध्ये त्यांनी मी निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, मी संसदेत कधीही निवडून जाऊ शकते. मात्र आता मागास लोकांसाठी लढायचे आहे. आता फक्त उत्तरप्रदेशवर लक्ष केंद्रित करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, उत्तर प्रदेशात महाआघाडीला जिंकून आणणे गरजेच आहे. राजकारणात अनेक मोठ मोठे निर्णय घ्यावे लागतात. सध्या देशाचे हित आणि पार्टीची चळवळ पाहता, यंदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. जर निवडणुकीनंतर संधी मिळाली तर पाहता येईल.’ असे मायावती यांनी सांगितले. उत्तर प्रदेशमध्ये यावेळी सपा आणि बसपा एकत्र निवडणूक लढवणार आहे. यूपीमधअये सपा-बसपाची आघाडीनुसार सपाकडे ३७ जागा आल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या ८० लोकसभा जागांवर बसपा ३८ जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर, या आघाडीने अमेठी आणि रायबरेलीच्या जागा काँग्रेसला सोडल्या आहेत. तर मथुरा, बागपत आणि मुझफ्फरनगरच्या जागा राष्ट्रीय लोकदल पक्षाला देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -