घरCORONA UPDATEधक्कादायक! या महापौरांनी कोरोनाचा संसर्ग करून घेतला

धक्कादायक! या महापौरांनी कोरोनाचा संसर्ग करून घेतला

Subscribe

जगभरात हाहाकार उडवणाऱ्या कोरोनो व्हायरसपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी सगळं जग धडपडत असताना जर्मनीत मात्र एक अघटीत घटना घडल्याचे समोर आले आहे. येथील बर्लिनचे महापौर स्टीफन वॉन डसेल यांनी रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी स्वत:ला कोरोनाचा संसर्ग करून घेतल्याचा धक्कादायक खुलासा केला. तसेच यादरम्यान आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त वेदनांना सामोरे जावे लागले. पण आपण कोरोनावर मात केली असून आता कोरोनामुक्त असल्याचा दावा डसेल यांनी केला आहे. डसेल यांच्या या खुलाशानंतर जर्मनीत खळबळ उडाली आहे.

डसेल यांनी नुकतीच येथील आरबी रेडिओला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी कोरोनावर आपले अनुभव सांगितले. महिन्याभरापूर्वी डसेल यांनी एक टि्वट केले होते. त्यात पत्नीला कोरोनाची लागण झाली असून मलाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले होते. तसेच आपली तब्येत खालावत असल्याचेही त्यांनी टि्वटमध्ये म्हटले होते. यामुळे बर्लिनमधील नागरिकांनी त्यांच्यासाठी व त्यांच्या पत्नीसाठी प्रार्थनाही केली होती. पण मुलाखतीत त्यांनी पत्नीला कोरोनाची लागण झाल्याने ती आपल्यालाही होणार हे मला माहित होते. म्हणून मी संसर्गाची वाट न पाहता रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी स्वत:हून पत्नीच्या वस्तू हाताळल्या. तिला स्पर्श केला होता. यामुळे मला लगेचच कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर मी स्वत:ला क्वारनटाईन केले. मला वाटले मी ३-४ दिवसात बरा होईन . मात्र मला कल्पनेच्या पलिकडे वेदना व त्रास झाला. पण मी आज कोरोनामुक्त असून कोरोना भयंकर आजार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर जगातील डॉक्टर जे सांगत आहेत त्याच पालन करा असा सल्लाही त्यांनी यावेळी जनतेला दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -