रॅम्प वॉक करताना विद्यार्थीनीचा अचानक मृत्यू

बंगळुरु मधील पीन्या येथील एका महाविद्यालयात रॅम्प वॉक दरम्यान एका २१ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे.

Bengaluru
mba student dies of cardiac arrest during ramp walk practice in bengaluru

बंगळुरु मधील पीन्या येथील एका महाविद्यालयात फ्रेशर्स डे दिवशी एका २१ वर्षीय एमबीएच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. शालिनी असे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. पीन्या येथील महाविद्यालयात एमबीएच्या प्रथम वर्षामध्ये ती शिक्षण घेत होती. हॉस्पिटलमध्ये दाखल करताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

अशी घडली घटना

एमबीए प्रथम वर्षाचे शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीचा फ्रेशर्स डे दिवशी रॅम्प वॉकवर कार्डियाक अरेस्टने मृत्यू झाला. रॅम्प वॉक केल्यानंतर ती व्यासपीठाच्या शेजारी उभी होती. त्यानंतर तिला कार्डियाक अरेस्ट येऊन ती जमिनीवर कोसळली, अशी माहिती पोलीस उपायुक्त शशी कुमार यांनी सांगितले. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. दुसऱ्या विद्यार्थ्याने तिला हॉस्पिटलमध्ये आणताच डॉक्टर्सनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी पीन्या पोलीस स्थानकात सेक्शन १७४ (सी) अंतर्गत अनैसर्गिक आणि आत्महत्या म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकणाचा तपास सुरु आहे.