मेरठमध्ये चिमुकलीच्या तोंडात सुतळी बॉम्ब फोडला

मेरठमध्ये चिमुरडीच्या तोंडात सुतळी बॉम्ब फोडल्याची घटना घडली आहे. मुलीवर उपचार सुरु असून प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Uttar pradesh
bomb cracked in mouth of baby
चिमुकलीच्या तोंडात सुतळी बॉम्ब फोडला

उत्तरप्रदेशमध्ये संतापजनक घटना घडली आहे. एका मस्तीखोर मुलाने एका तीन वर्षाच्या मुलीच्या तोंडामध्ये बॉम्ब फोडला. मेरठच्या मिलका गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या मुलाने चिमुकलीच्या तोंडात सुतळी बॉम्ब ठेवला आणि तो पेटवला. बॉम्ब तोंडात फुटल्याने चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. तिला ताबडतोब कुटुंबियांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

तोंडात सुतळी बॉम्ब फोडला

या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. गावातील लोकांनी घटनेनंतर आरोपीला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपी त्यांना सापडला नाही. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पीडित मुलगी घराबाहे खेळत होती. घराबाहेर मुलं फटाके वाजवत होती. दरम्यान गावातील एक मस्तीखोर मुलाने चिमुकलीच्या तोंडात सुतळी बॉम्ब ठेवून तो पेटवला. तोंडात बॉम्ब फुटल्याने चिमुकलीच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली आहे.

५० पेक्षा अधिक टाके पडले

गंभीर जखमी झालेल्या आरुषीला वडील शशिपाल यांनी ईश्वर नर्सिंग होममध्ये उपचारासाठी दाखल केले. तिच्यावर उपचार सुरु असून तिच्या तोंडाला ५० पेक्षा जास्त टाके पडले आहेत. दुखापत मुलीच्या गळ्यापर्यंत पोहचली आहे. त्यामुळे मुलीची प्रकृती गंभीर होत चालली आहे. दरम्यान आरुषीच्या वडिलांनी हरपाल नावाच्या युवकाविरोधात तक्रार केली आहे. पोलीस याप्रकरणाचा तपास करत असून आरोपीचा शोध घेत आहेत. म्हटलं जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here