घरताज्या घडामोडीCoronavirus: मेरठ मधील खासगी लॅबचा ढिसाळ कारभार आला उघडकीस!

Coronavirus: मेरठ मधील खासगी लॅबचा ढिसाळ कारभार आला उघडकीस!

Subscribe

मेरठ मधील या खासगी लॅबमध्ये निगेटिव्ह लोकांचा अहवाला पॉझिटिव्ह दिला.

उत्तर प्रदेश मधील मेरठ शहरातील मॉडर्न पॅथॉलॉजी लॅबमधील कोरोना चाचणी संदर्भात निष्काळजीपणा होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या दिवसात लॅबमध्ये आठ जणांच्या नमुन्यांची चाचणी केल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. जेव्हा या लोकांची सरकारी लॅबमध्ये पुन्हा तपासणी केली तेव्हा सहा लोक निगेटिव्ह असल्याचे आढळले. लोकांच्या जीवाशी खेळत असणाऱ्या लॅबचा परवाना रद्द करण्यासाठी डीएमने सरकारला शिफारस केली आहे.

मॉडर्न लॅबचे राणी मिल बागपत रोड येथे दोन सेंटर आहे. गुरुग्रामची ही कंपनी आहे. या लॅबमध्ये प्रत्येक चाचणीसाठी ३ हजार ८०० रुपये घेतले जातात. सीएमओ डॉ. राजकुमार म्हणाले की, आतापर्यंत मॉडर्न लॅबमधून १ हजार २५३ नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. यापैकी २४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी एका महिलेच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली होती आणि त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पण या लॅबने त्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह दिला होता. बनावटपणाच्या संशयावरुन मॉडर्न लॅबमधील आठ नमुन्यांची चाचणी २४ मे रोजी मेडिकलच्या बायोलॉजी मायक्रो लॅबमध्ये करण्यात आली. यामध्ये सहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर या खासगी लॅबमध्ये हे सर्व अहवाल २१ मे रोजी पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे नमुन्यांच्या चाचणीत निष्काळजीपणा आणि गडबड असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे या लॅबवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सीएमओ म्हणाले की, मेरठमधून लॅब कर्मचारी नमुने गोळा करतात आणि त्याची गुरुग्राममध्ये तपासणी केली जाते. या लॅबला सरकारकडून चाचणी करण्यास मान्यता दिली आहे. पण डीएमच्या सूचनेनुसार पॉझिटिव्ह नमुन्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली आहे. सीएमओचे म्हणणे आहे की, यंत्रणांची काही चूक असू शकते. परंतु त्याकडे मोठे दुर्लक्ष केले. प्रशासनाने यावर गंभीर चौकशी सुरू केली आहे.

- Advertisement -

मॉडर्न लॅबमधील निष्काळजीपणा समोर आला आहे. या प्रकरणाबाबत तपास केला जात आहे. यामध्ये जो दोषी आढळले त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. लॅब परवाना रद्द करावा यासाठी सरकारला शिफारस केली आहे. या संपूर्ण प्रकरणात सीएओकडून अहवाल मागविण्यात आला आहे. – डीएम अनिल ढींगरा, मेरठ


हेही वाचा – महाराष्ट्रात खंबीर नेतृत्वाची कमतरता; पीयूष गोयल यांनी ठाकरे सरकारवर केला आरोप


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -