घरदेश-विदेशज्योतिरादित्य सिंधिया आणि सोनिया गांधी यांची भेट पुढे ढकलली

ज्योतिरादित्य सिंधिया आणि सोनिया गांधी यांची भेट पुढे ढकलली

Subscribe

आज सोनिया गांधी आणि शरद पवार यांची नवी दिल्लीत बैठक पार पडली.

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार होते. मात्र, ही भेट पुढे ढकलण्यात आली आहे. भेटीदरम्यान मध्य प्रदेश राज्यातील राजकीय परिस्थिती तसेच प्रदेशाध्यक्ष पदावर चर्चा होणार होती. ज्योतिरादित्य सिंधिया महाराष्ट्र विधासभेच्या उमेदवार निवड समितीचे अध्यक्ष असून सोनिया गांधी आज महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांसोबत बैठक घेणार असल्याची माहिची सुत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नवी दिल्लीत बैठक पार पडली.

काँग्रेसची नव्या अध्यक्षासाठी गुरुवारी बैठक

ज्योतिरादित्य सिंधिया यांना नवीन जबाबदारी देण्याची मागणी राज्यातून सातत्याने होत आहे. लोकसभा निवडणुकीत ज्योतिरादित्य सिंधिया यांना उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली होती. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला होता. आगामी विधानसभा निवडणूक तसेच नवीन अध्यक्ष नेमण्यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या देशभरातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलाविली आहे. ही बैठक १२ सप्टेंबर रोजी दिल्लीत होणार असून या महत्वपूर्ण बैठकीस सर्व प्रदेशाध्यक्ष, महासचिव तसेच सर्व विधीमंडळाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार-सोनिया गांधी यांची भेट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -