ट्रम्प यांचे व्हाइट हाऊस निसटले, बायकोही घटस्फोटाने करणार एक्झिट

Melania to divorce Donald Trump as soon as he leaves White House
ट्रम्प यांचे व्हाइट हाऊस निसटले, बायकोही घटस्फोटाने करणार एक्झिट

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडेन बहुमताने विजयी झाले आहे. त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदावरून पायउतार व्हाव लागणार आहे. संपूर्ण जगाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवर लक्ष होत. अखेर भरघोस मतांनी विजयी होऊन जो बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान होणार आहेत. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षच्या निवडणुकीनंतर आणखी एक झटका बसणार आहे. सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातून व्हाइट हाऊस निसटले असून आता त्यांची बायको मेलेनिया ट्रम्प देखील त्यांच्या आयुष्यातून एक्झिट घेणार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ट्रम्प यांना कौटुंबिक धक्का बसण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना मलेनिया ट्रम्प घटस्फोट देण्याचे वृत्त डेली मेल या वृत्तपत्राने दिलं आहे. मलेनिया ट्रम्प या एका पूर्व सहयोगीच्या माहितीवरून हे वृत्त देण्यात आले आहे.

स्टेफनी वोल्कॉफनच्या हवाल्याने डेली मेलच्या वृत्तानुसार, १५ वर्षापूर्वी सुरू झालेल्या डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया यांच्यातील नाते आता संपणार आहे. दोघांच्या नात्याला तडा गेला असून व्हाइट हाऊस सोडताच दोघांचा घटस्फोट होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प आणि मेलेनिया वेगवेगळ्या रुममध्ये राहत आहेत. त्यामुळे सध्या मेलेनिया आणि ट्रम्प घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान मेलेनियाने मुलगा बॅरेनचा ताबा आणि संपत्तीचा अर्धा वाटा मागितला आहे. स्टेफनी वोल्कॉफन मेलेनिया आणि ट्रम्प यांच्या लग्नाला ट्रंजेक्शन असे म्हटले आहे.

एवढंच नाहीतर या संदर्भात ट्रम्प यांच्या राजकीय सहयोगी ओमरोसा मॅनिगॉल्ट न्यूमॅमन यांनीही ट्रम्प यांच्या घटस्फोटाच्या बातमीला दुजोरा दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया यांच्या प्रेम प्रकरणाला १९९८ साली सुरुवात झाली होती. त्यावेळी ट्रम्प ५२ वर्षांचे होते तर मेलेनिया २८ वर्षांच्या होत्या. टाइम्स स्क्वेअरच्या किटकॅट क्लबमध्ये एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ट्रम्प आणि मेलेनिया यांची भेट झाली आणि त्यानंतर यांच्या भेटीगाठी वाढल्या. २००४मध्ये १.५ मिलिअनची डायमंड रिंग देऊन मेलेनिया यांना लग्नाची मागणी घातली होती. त्यानंतर २२ जानेवारी २००५मध्ये ट्रम्प आणि मेलेनिया यांचं लग्न झालं.


हेही वाचा – जो बायडेन यांना कंगना रनौत म्हणाली ‘गजनी’