माल्ल्याला भारतात आणण्यावरून नेटिझन्स पेटले, एक सो एक मीम्स व्हायरल!

Mumbai
vijay mallya memes

भारतीय बँकांना म्हणजेच पर्यायाने भारतीयांना ९ हजार कोटींचा चुना लावून परदेशी फरार झालेल्या विजय माल्ल्याला कोणत्याही क्षणी भारतात आणलं जाऊ शकतं, असं वृत्त बुधवारी जाहीर झालं आणि तमाम नेटिझन्स निसर्ग चक्रीवादळ आणि पार कोरोनालाही विसरले आणि विजय माल्ल्यावर तुटून पडले! म्हणजे शब्दश: नाही हो, सोशल मीडियावर. कित्येक वर्ष विजय माल्ल्या बाहेर फरार होता आणि आता त्याला नाकाला मुसक्या बांधून आणलं जाणार आहे की काय, असा भास आता होऊ लागला आहे. त्यामुळे अर्थातच नेटिझन्सच्या क्रिएटिव्हिटीला ऊत न आला असता तरच नवल! विजय माल्ल्याच्या नावाने फुल्ल ऑन मीम्स आता व्हायरल होऊ लागले आहेत.

विजय माल्ल्याने लंडनच्या कोर्टामध्ये अनेकदा त्याच्या प्रत्यार्पणाविरोधात अपील करून देखील ते मंजूर न झाल्यामुळे अखेर त्याला भारतात प्रत्यार्पित करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या महिन्याच्या म्हणजेच एप्रिलच्या २८ तारखेला त्याचं शेवटचं अपील लंडन न्यायालयाने फेटाळलं आणि भारतीय त्याच्या वाटेला डोळे लावून बसले. शेवटी महिन्याभरात त्याला भारताच्या हवाली केलं जाऊ शकतं, असं ठरलं. आता त्याच्या प्रत्यार्पणाचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले असून तो कोणत्याही क्षणी भारताच्या हवाली केला जाऊ शकतो, असं बुधवारी जाहीर करण्यात आलं. आणि नेटिझन्सचे एक सो एक मीम्स यायला लागले!

हेराफेरी सिनेमा आठवतोय का?

हम साथ साथ हैमधलं ते अजरामर गाणं…

पोलीस दादा, हाण त्याला हाण…

बँका काय करत असतील बुवा आत्ता??

हे बघा, यांना हेलन आठवलीये!

आता येऊच दे तो माल्ल्या, ही गँग्ज ऑफ वासेपूर तयारच आहे!

हे बघा…

बैठे क्या हो? नाचोssss

आता नेटिझन्सनी माल्ल्याचा इतका कीस पाडल्यानंतर माल्ल्या खरंच येणार की नेहमीप्रमाणे कल्टी मारणार, हे तर कळेलच. पण तोपर्यंत यांच्या क्रिएटिव्हिटिला मात्र असेच धुमारे फुटत राहणार हे नक्की!