‘मेरा परिवार भाजप परिवार’, भाजपचा नवा मार्केटिंग फंडा

'मेरा परिवार भाजपा परिवार' या राष्ट्रव्यापी उपक्रमांतर्गत देशातील सुमारे ५ करोड घरांवर भाजपचे झेंडे लावले जाणार आहेत. 

Mumbai
Mera parivar bhajapa parivar,bjp;s new promtion funda
भाजप अध्यक्ष अमित शाहांनी केली घोषणा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष प्रचार – प्रसारामध्ये सक्रिय झाले आहेत. या स्पर्धेमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षही मागे नाही. रॅली, सभा आणि पोस्टरबाजीसोबतच भाजपने ‘नमो अॅप’द्वारे ऑनलाईन बाजारपेठेतही  आपला जम बसवला आहे. मोदींच्या नावाचा आणि विचारांचा प्रसार करणारी अनेक उत्पादनांची भाजपने ऑनलाईन विक्री सुरु केली आहे. मोदींच्या चेहऱ्याशी साधर्म्य असलेला एक मास्कही नुकताच मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे. दरम्यान, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप अध्यक्ष अमित शाहा यांनी एका नव्या कॅम्पेनची घोषणा केली आहे. भाजपकडून १२ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान ‘मेरा परिवार भाजपा परिवार’ हा राष्ट्रव्यापी उपक्रम राबवला जाणार आहे. या विशेष उपक्रमादरम्यान भाजप कार्यकर्त्यांमार्फत देशातील सुमारे ५ करोड घरांवर भाजपचे झेंडे लावले जाणार आहेत.


वाचा : हिंदुत्ववाद्यांनीच राम मंदिराचा विषय गुंडाळला – शिवसेना

या उपक्रमासंदर्भात अमित शाहा यांनी भाजप कार्यालयात जाऊन पक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. शाहा यांनी एका व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आणि राज्य महासचिवांशी चर्चा करुन, ‘मेरा परिवार भाजपा परिवार’ या उपक्रमाची घोषणा केली. अमित शाहाने देशातील सर्व भाजप कार्यकर्त्यांना आणि मोदी समर्थकांना आवाहन केलं आहे, की ‘या उपक्रमामध्ये सहभागी होत त्यांनी आपापल्या घरावर भाजपचे झेंडे उभारावेत आणि भाजपला विशाल प्रमाणात पाठिंबा दर्शवावा.’ दरम्यान, याच व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये शाहा यांनी आगामी निवडणुकांतील भाजपच्या रणनितीवरही चर्चा केली.

याशिवाय भाजपकडून येत्या २६ फेब्रुवारीला आणखी एक खास उपक्रम राबवण्यात येणार आहे. ‘कमल ज्योती संकल्प’ असं या उपक्रमाचं नाव असून, याअंतर्गत मोदी सरकारच्या योजनांचे लाभार्थी असलेल्या सर्व घरांमध्ये पक्षामार्फत दिवे उजळवले जाणार आहेत. भाजपच्या ‘मिशन २०१९’ या निवडणूक विशेष कॅम्पेनअंतर्गत हे दोन्ही उपक्रम राबवले जाणार आहेत.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here