उदरांनी खाल्ले तब्बल १२ लाख!

उंदरांनी आतापर्यंत कपडे, धान्य, पुस्तकं कुरतडल्याचे ऐकलं होतं. मात्र एटीएम मशीनमध्ये घुसून त्यामधील नोटा कुरतडल्याची बातमी आपण कधी ऐकली नसेल. पण आसामध्ये असाच काही प्रकार घडला आहे. उंदरांनी चक्क १२ लाख रुपये कुरतडल्याचे समोर आलं आहे.

Assam
Assam SBI ATM
उंदरांनी कुरतडले १२ लाख रुपये

आसाममध्ये एटीएममधील पैसे उंदरांनी कुरतडले आहेत. आसामच्या तिनसुकिया येथील ही घटना आहे. स्टेट बँक ऑफ इंडियांच्या एटीएममधील तब्बल १२ लाख ३८ हजार रुपये उंदरांनी कुरतडले आहेत. गेल्या २२ दिवसापासून हे एटीएम बंद होते. एटीएमची दुरुस्थी करण्यासाठी टेक्निशियन आल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला.

बंद एटीएममध्ये उंदरांचा धुमाकुळ

तिनसुकियाच्या लैपुली भागात असणारे स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम २० मेपासून तांत्रिक अडचणीमुळे बंद होते. याच दरम्यान उंदरांनी एटीएमवर डल्ला मारत त्यामधील १२ लाखांच्या रुपये कुरतडले. ११ जूनला जेव्हा टेक्निशियन एटीएम मशीन दुरुस्थीसाठी आले. तेव्हा त्यांना एटीएममधील ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांचे तुकडे जमिनीवर पडल्याचे आढळले.

उंदरांच्या तावडीतून १७ लाख वाचले

एसबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या एटीएमला गुवाहटीची ग्लोबल बिझनेस सोल्यूशन नावाची फायनान्स कंपनी चालवते. या कंपनीने १९ मे रोजी एटीएममध्ये २९ लाख रुपये टाकले होते. आणि दुसऱ्याच दिवशी हे एटीएम बंद पडले. त्यानंतर उंदरांनी एटीएममध्ये धुमाकुळ घालत त्यामधील १२ लाख रुपये कुरतडले. तर त्या २९ लाख रुपयांमधील फक्त १७ लाख रुपये वाचले.

उपस्थित होत आहे अनेक प्रश्न

एसबीआय बँकेने याप्रकरणी तिनसुकिया पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. याप्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एटीएममध्ये ठेवलेल्या पैशांना उंदरांनी कुरतडले यावर लोकांना विश्वास बसत नाहीये. घटनेची माहिती मिळताच लोकांनी सोशल मीडियावरुन अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ऐवढ्या दिवस एटीएम बंद का होते? तसंच टेक्शिनिशयनला बोलवण्यात ऐवढा विलंब का लावला? असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे.